Ekanth Shinde Raksha Khadse  sarkarnama
महाराष्ट्र

Raksha Khadse Daughter Molested : मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणारे शिवसेनेचे कार्यकर्ता? शिंदेंच्या आमदाराने दिले स्पष्टीकरण

Shiv Sena Worker Accused of Harassing Of Raksha Khadse Daughter : पोलिसांन दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत भोई, पियुष मोरे, सोहोन कोळी, अनुज पाटील,किरण माळी, सचिन पालवी यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

Roshan More

Raksha Khadse News : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या विषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना या छेडछेडीच्या घटनेमागे विशिष्ठ पक्षाचे लोक असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ते कोणत्या पक्षाचे लोक होते याची चर्चा सुरू झाली आहे.

खासदार रक्षा खडसे यांची सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. या क्लीपमध्ये त्या छेडछाड करणारे एकनाथ शिंदें यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते असल्याचे म्हणत आहेत, तसेच शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे ते कार्यकर्ते असल्याचे देखील म्हणत आहेत. विशेष म्हणजे व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लीपमध्ये रक्षा खडसे या छेडछाडीमध्ये आरोपी असलेल्या पियुष मोरे याला खडसावत आहेत. या ऑडिओ क्लीपची सत्यता समजू शकली नाही.

मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी साम टिव्हीशी संवाद साधताना सांगितले की, ते लोक कोणत्या विशिष्ठ पक्षाशी संबंधित आहेत हे आपल्याला माहीत नाही. मात्र, जे आरोपी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.

पोलिसांन दिलेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये अनिकेत भोई, पियुष मोरे, सोहोन कोळी, अनुज पाटील,किरण माळी, सचिन पालवी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी यात्रेमध्ये मुलींचा पाठलाग केला तसेच पाळण्यामध्ये बसलेल्या असताना एका मुलीला धक्का दिला. आरोपींच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

व्हायरल ऑडिओ क्लीपमध्ये काय?

व्हायरल ऑडिओ क्लीपमध्ये रक्षा खडसे म्हणत आहेत की, 'पियुष, तुमच्या जुन्या गावामध्ये त्या पोरांनी कृषिकाचा व्हिडिओ काढला अन् तुम्ही त्याला सपोर्ट करता. दोनवेळा तसं झालं ना, हे बघ मी तिथं आले ना धिंगाणा करेन, ती माझी पोरगीय. तिच्या सुरक्षेसाठीच मी त्या लोकांना (पोलिसांना) तिथं ठेवलंय. तुम्ही फक्त त्या आमदाराचे पाय चाटायला तिथ बसलेले आहेत. ते आमदाराचेच लोकं होते ना?'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT