Rajesh Tope sarkarnama
महाराष्ट्र

Unlock : राजेश टोपे म्हणाले, ''दिवाळीनंतर कुठेही फिरा'

महाविकास आघाडी सरकार आता राज्य अनलॅाक करण्याचा दिशेने विचार करीत आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी याबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्य सरकारने या महिन्यात कोरोनाच्या नियमावलीत शिथिलता दिली आहे. शाळा-महाविद्यालये, चित्रपटगृहं-नाट्यगृहं यासह इतरही सेवा सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने आता राज्य अनलॅाक करण्याचा दिशेने विचार करीत आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी याबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

''एक लस घेतल्यांनाही सर्व ठिकाणी प्रवेश देण्याच्या आणि राज्यात संपूर्ण अनलॉक करण्याच्या विचारात आहेत,'' अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राजेश टोपे एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. यामुळे लशीचा एक डोस घेतलेल्यांना दिलासा मिळणार आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत होत असलेली घट लक्षात घेऊन राज्य सरकार निर्बंध शिथिल करत आहे. दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भावही कमी झाला आहे.

राजेश टोपे म्हणाले, '''दिवाळीनंतर कोरोना लसीचा एक डोस घेतलेल्या नागरिकांनाही मॉल्स, लोकल रेल्वे तसेच इतर सर्वच ठिकाणी प्रवेश मिळणार आहे. दिवाळीनंतर मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेणार आहेत. दिवाळीनंतर कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन लोकांना सामोरं जावं लागत असलेल्या या असुविधेतून सुटका करण्यासाठी लसीची एक मात्रा देखील पुरेशी ठरणार आहे. टास्क फोर्सच्या सहमतीने मुख्यमंत्री दिवाळीनंतर निर्णय घेतील.''

'''राज्यात मोठ्या प्रमाणात हर्ड इम्युनिटी आलेली असेल आणि टास्क फोर्स, आरोग्य विभागाची सहमती असेल तर असा निर्णय घेतला जाऊ शकतो. कोविशिल्डच्या पहिल्या डोसनंतर 84 दिवसांचा कालावधी दुसऱ्या डोससाठी दिलेला आहे. त्यामुळं मोठं अंतर असल्यानं असुविधा होते. त्यामुळे आरोग्याविषयक बाब लक्षात घेऊन यावर निर्णय घेतला जाईल', असं टोपे म्हणाले.

"बहुत हुई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार? राष्ट्रवादीनं डिवचलं

मुंबई : महाविकास आघाडी सरकार भ्रष्टाचारासाठी सॉफ्टवेअरचा वापर करत असल्याचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप नुकताच केला आहे. ''फडणवीस सरकारच्या काळात डिजीटल दलाल होता. फडणवीस सरकारच्या काळात काय-काय घोटाळे झाले हे लवकरच बाहेर काढू,'' अशा इशारा राष्ट्रवादीचे नेते, अल्पसंख्याक मंत्री, नवाब मलिक (ncp nawab malik) यांनी दिला आहे. नवाब मलिक (ncp nawab malik) पत्रकार परिषदेत बोलत होते. पेट्रोल दरवाढीवरुन त्यांनी मोदी सरकारवर (Narendra Modi) निशाणा साधला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT