160 crore land scam and possible action against revenue officials. Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Land Scam : 40 लाखांचे केले थेट 160 कोटी, मोठा जमीन घोटाळा उघडकीस; महसूल अधिकारी रडारवर!

Chandrakant Raghuwanshi Navapur Land Scam IAS Pravin Gedam SIT : 40 लाखांच्या जमीन दाखवून पुन्हा त्याच्यावर 160 कोटी रुपये मिळवण्याचा धक्कादायक घोटाळा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांमुळे उघडकीस आला आहे.

Sampat Devgire

Land Scam News : नंदुरबार जिल्ह्यात महामार्गाचे भूसंपादन सुरू आहे. नवापूर येथील आदिवासींची जमीन थेट एका व्यापाऱ्याने खरेदी केली. त्यानंतर महसूल अधिकारी आणि व्यापारी यांनी संगनमताने मोठा घोटाळा केला आणि 40 लाखांच्या जमीनेचे तब्बल 160 मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

आदिवासींची जमीन कोणत्याही प्रकारे बक्षीस पत्र करून हस्तांतरित केली जात नाही. मात्र नवापूर येथील प्रकरणात एका व्यापाऱ्याने ही जमीन खरेदी केली. महामार्गाच्या भूसंपादनासाठी तिचे मूल्यांकन 40 लाख रुपये करण्यात आले.

त्यानंतर उपविभागीय अधिकारी आणि संबंधित व्यापाऱ्याने संगतमताने केले. त्यात 40 लाखांच्या या जमिनीसाठी आठ कोटी रुपयांचे अवार्ड करण्यात आले. त्याच्या अपिलात ते थेट 163 कोटी झाले. हे गौड बंगाल धक्कादायक एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले. या प्रकरणी त्यांनी विधीमंडळात लक्षवेधी मांडली.

एसआयटी स्थापन

या प्रकरणावर आमदार रघुवंशी आक्रमक होते. त्यांच्या पाठपुराव्याला प्रतिसाद देत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले. आता या प्रकरणात नाशिकचे महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्यात आली. या समितीकडून एक महिन्याच्या आत अहवाल सादर केला जाईल. यातील दोषी महसूल अधिकाऱ्यांवर गंभीर कारवाई करण्यात येणार आहे.

बावनकुळेंनी मानले आभार

महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने झालेल्या या घोटाळ्यांनी मंत्रीही आश्चर्यचकित झाले. या लक्षवेधीमुळे शासनाचा मोठा निधी वाचणार आहे. हा महत्त्वाचा घोटाळा उघडकीस आणल्याबद्दल महसूल मंत्र्यांनी आमदार रघुवंशी यांचे अभिनंदन केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT