Eknath Shinde
Eknath Shinde  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Shinde News: ''आमदारकीचं तिकीट देऊ नका,मात्र...''; शिंदे गटाच्या नेत्याचं मुख्यमंत्र्यांसमोरच सूचक विधान

सरकारनामा ब्यूरो

Suhas Kande News : गेल्या अनेक वर्षांपासून करंजवण-मनमाड पाणी पुरवठा योजना प्रलंबित होती. या योजनेसाठी मोठा पाठपुरावा केला. माजी मुख्यमंत्र्यांकडे 25 वेळा चकरा मारल्यानंतरही ही योजना पूर्ण झाली नाही. मात्र, राज्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यावर एका क्षणात मुख्यमंत्र्यांनी ही योजना मंजूर केली असे कौतुकोद्गार एकनाथ शिंदे यांच्याविषयी आमदार सुहास कांदे यांनी काढले. यावेळी कांदेंनी मुख्यमंत्र्यांसमोरच एक मोठं विधान केलं आहे याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करंजवण-मनमाड पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. कांदे म्हणाले, मुख्यमंत्रीसाहेब, एकवेळ आमदारकीचं तिकीट नका देऊ, मात्र ही योजना पूर्ण करा. सव्वा लाख मनमाडकरांची इच्छा पूर्ण करा. या लोकांचे देणं लागतो आहे, त्यामुळे तुमच्याकडे मागतो आहे. एकही रुपया कमी पडणार नाही अशी ग्वाही द्या असंही कांदे (Suhas Kande) म्हणाले.

तसेच माजी मुख्यमंत्र्याकडे मनमाड करंजवण पाणी पुरवठा योजनेच्या स्वनिधीसाठी 25 वेळा चकरा मारल्या. शेवटी वैतागून एक दिवस पत्र फाडलं, सगळं सोडून दिले. काही महिन्यांनंतर राज्यात शिंदे सरकार आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो, मनमाडची व्यथा मांडली. पाणी नसल्याने मनमाडवासियांचे हाल होत आहेत, स्थलांतर वाढलं आहे, व्यापारी वर्ग ढासळला आहे अशी सर्व व्यथा त्यांना ऐकवली.

मुख्यमंत्री मला देवासारखे भेटले. तातडीने त्यांनी योजनेला हिरवा कंदील दिला. स्वनिधीचे 15 टक्के देणार असे आश्वासन दिले, त्यामुळे हत्तीचे बळ आले. त्यानंतर प्रशासकीय मान्यता मिळाली आणि आज या योजेनचे भूमिपूजन झाले असंही कांदे यांनी यावेळी सांगितले.

गेल्या सत्तर वर्षापासून मनमाड करंजवण योजना जैसे थे होती. मनमाड शहर परिसरात पाण्याचा स्रोत नाही. पाणी उपल्बध नसल्याने उन्हाळभर महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते. मात्र जेव्हा आमदार झालो, पहिल्यांदा या योजनेचा पाठपुरवठा सुरु केला. पण अखेर या योजनेसाठी 15 टक्के स्वनिधी हवा होता. त्यात मनमाड नगरपालिका ब वर्गात असल्याने ते शक्य नसल्याचेही कांदे यांनी यावेळी सांगितले. पण आता ही योजना पूर्ण करावी अशी मागणी कांदे यांनी यावेळी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT