Ramdas Athwale: Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ramdas Athwale: नाव बदलून शहराचा विकास होत नाही; रामदास आठवलेंना नक्की म्हणायचं काय?

केंद्र सरकारने नुकताच औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशिव असे करण्याचा निर्णय घेतला.

सरकारनामा ब्युरो

Ramdas Athwale News : कोणत्याही शहराचे नाव बदलले म्हणून विकास होत नाही. पण औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांचा विकास करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मांडले आहे. ते नाशिक मध्ये पत्रकारांशी बोलत होते.

केंद्र सरकारने नुकताच औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशिव असे करण्याचा निर्णय घेतला. यावर रामदास आठवले यांनीही भाष्य केलं आहे. आठवले म्हणाले की, उस्मानाबाद हा जिल्हा दुष्काळी जिल्हा आहे तिथं पाण्याचे स्त्रोत तयार केल्यास त्या भागाचा विकास होऊ शकतो. औरंगाबाद शहरात देखील चांगली विकासकामे सुरु आहेत.

रामदास आठवले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शाह (Amit Shah) यांच्या हातातील बाहुली नाही. खरी शिवसेना एकनाथ शिंदेचीच आहे.त्यामुळे शिवसेना आणि भाजपची युती होईल. या युतीत आरपीआयला चांगल्या जागा मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आमच्या पक्षाला स्वत:च चिन्ह नाही. त्यामुळे आम्हाला दुसऱ्या पक्षाच्या चिन्हांवर निवडणूक लढवावी लागते. पण आमचे लोक कमळ चिन्हावर निवडून आले तरी ते भाजपमध्ये जात नाहीत. आमच्या पक्षाला कायम स्वरुपी चिन्ह मिळवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहे, असे रामदास आठवलेंनी सांगितले.

तसेच, मेघालय, त्रिपुरा आणि नागालॅंड या राज्यांमध्ये आरपीआयची चांगली स्थिती आहे. या राज्यांमध्ये आगामी निवडणुकीत आमच्या एक-दोन जागा निवडून येतील, अशी शक्यता आहे. असे रामदास आठवले यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT