Kasba By-Election : धंगेकरांची उमेदवारी रद्द करा : भाजप तक्रार करणार; निवडणूक आयोगाची भूमिका काय?

Kasba By-Election : उपोषण करणे आचाकसंहितेचा भंग..
Ravindra Dhangekar : Kasba By-Election
Ravindra Dhangekar : Kasba By-Election Sarkarnama
Published on
Updated on

Kasba By-Election : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) पुरस्कृत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी, अशी मागणी भाजपने निवडणूक आयोगाकडे केली आहे. धंगेकरांनी आचारसंहितेचे उल्लंघन केले, अशी तक्रार ही भाजपकडून आयोगाकडे दाखल करण्यात येणार आहे. भाजपचे संघटन मंत्री राजेश पांडे (Rajesh Pande) यांनी ही माहिती दिली.

काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी प्रचार करायचा अवधी संपलेला असतानाही, कसबा गणपती समोर उपोषणाचे आंदोलन करून निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन करण्यात आले आहे. तसेच, धंगेकरांनी प्रचारसभेदरम्यान त्यांनी धार्मिक धृवीकरण घडवण्याचा प्रयत्न केला आहे, अशी ही तक्रारही दाखल करण्यात येणार आहे. धंगेकरांनी उपोषण करणे, हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे, असा आरोप भाजपने केला आहे.

Ravindra Dhangekar : Kasba By-Election
Kasba By-Election : अखेर रवींद्र धंगेकरांचे उपोषण मागे; भाजपवर केला होता 'हा' आरोप

कसबा पेठ पोटनिवडणुकीत पैशांचा सर्रास वापर केला जात आहे, असा आरोप धंगेकरांनी केला होता. यानंतर त्यांनी उपोषण अस्त्र उगारले होते. सकाळी १० वाजता त्यांनी मतदारसंघातील कसबा गणपती मंदिरासमोर उपोषण आंदोलनाला सुरूवात केली होती. या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडून येऊ नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी काग्रेस व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर जमले होते.

"काल प्रचार करण्याचा शेवटचा दिवस होता, प्रचार सायंकाळी ५ वाजता संपुष्टात आला. मात्र तरीही भाजपचे नेते, हे रात्री ९ वाजेपर्यंत प्रचार करत होते. हे आचारसंहितेचे उल्लंघन असून, लोकशाहीची हत्या केली जात आहे," असा आक्षेप घेत धंगेकरांनी भाजपवर जोरदार प्रहार केला होता.

Ravindra Dhangekar : Kasba By-Election
By-Election : मतदारांना पैसे वाटताना भाजप कार्यकर्त्यांना पकडले; पावणेदोन लाखांची रोकड जप्त, गुन्हा दाखल

निवडणुकीत पैशांचा सर्रास वापस केला जात आहे. आणि प्रशासन हे उघड्या डोळ्यांनी बघत आहे, ही दडपशाहीच आहे, असेही धंगेकर म्हणाले. अखेर पोलिसांनी यावर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर धंगेकरांनी आपलं उपोषाण मागे घेतले.

दरम्यान, धंगेकरांच्या उपोषणावर आक्षेप घेत, भाजपने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. धंगेकरांची उमेदवारीच रद्द करण्यात यावी, अशी मागणी भाजपने केली आहे. यावर आता निवडणूक आयोग काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com