Ram Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP News : सभापती राम शिंदे यांचा फोटो छापायचा राहिला... कर्जतमध्ये समर्थकांचा थयथयाट

District Bank’s annual report controversy : जिल्हा बँकेच्या वार्षिक ताळेबंद मध्ये विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांचा फोटो न छापल्यावरून सध्या वाद सुरू झाला आहे.

Aslam Shanedivan

  1. जिल्हा बँकेच्या वार्षिक ताळेबंदात विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांचा फोटो न छापल्याने वाद निर्माण झाला.

  2. माजी जिल्हा परिषद सदस्य अँड. कैलास शेवाळे यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

  3. या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून बँक प्रशासनावर टीका होत आहे.

Jalgaon News : जिल्हा बँकेच्या वार्षिक ताळेबंदमध्ये राजशिष्टाचारप्रमाणे विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांची प्रतिमा असणे गरजेचे होते. मात्र ती न छापल्याने त्यांच्यासह आम्हा सर्वांची अवहेलना झालेली असून या बाबत जिल्हा बँकेने तत्काळ त्यांची छबी टाकीत पुन्हा सदर अहवाल प्रसिद्ध करावा. ही बाब कदापी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य अँड.कैलास शेवाळे यांनी दिला आहे.

जिल्हा बँकेच्या वार्षिक ताळेबंदमध्ये विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे छायाचित्र नसल्याचे पडसाद तालुक्यात उमटले. आज तालुक्यातील माही जळगाव येथे भाजप सह महायुती मित्र पक्षाचे वतीने या प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अशोक खेडकर, तालुकाध्यक्ष अनिल गदादे, बाजार समितीचे संचालक अँड.हर्ष शेवाळे, महादेव शिंदे, सुदाम जाधव, सरपंच गोकुळ इरकर, सरपंच हनुमंत नवसरे, नंदलाल काळदाते, राजेंद्र गायकवाड, बापू शिंदे, किशोर कोपनर, संतोष निंबाळकर, अभिमान काळगे, अण्णा जाधव, रामदास टकले, अजिनाथ शिंदे मच्छिंद्र खेडकर, हनुमंत माने, अंगद डाडर, आदीसह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपल्या भाषणात तीव्र भावना व्यक्त केल्या.

जिल्हा बँकेच्या येथील शाखेच्या माध्यमातून तालुका विकास अधिकारी प्रदीप सातपुते आणि बाळासाहेब रसाळ यांनी दिलगिरी व्यक्त करीत आपल्या भावना वरिष्ठ कार्यालयात कळविण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले. त्या नंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. अशोक खेडकर म्हणाले विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचे नाव व फोटो प्रोटोकॉल प्रमाणे छापणे गरजेचे होते मात्र ते न छापून खूप मोठी चूक केली आहे. या बाबत पुन्हा नव्याने शिंदे साहेबांचा फोटो टाकून अहवाल छापावा.

अँड.हर्ष शेवाळे म्हणाले ही अतिशय गंभीर चूक आहे. त्याची दिलगिरी व्यक्त करून हे प्रकरण थांबणार नाही तर पुन्हा एकदा राम शिंदे यांचा फोटो टाकून ताळेबंद अहवाल पुन्हा प्रकाशित करावा. यावेळी सर्वच वक्त्यांनी तीव्र भावना व्यक्त करीत या झालेल्या प्रकारा बद्दल जिल्हा बँक प्रशासनाचा निषेध केला.

FAQs :

1. राम शिंदे यांचा फोटो कुठे गहाळ झाला आहे?
जिल्हा बँकेच्या वार्षिक ताळेबंद अहवालातून.

2. या प्रकरणात कोण आक्रमक झाले आहेत?
माजी जिल्हा परिषद सदस्य अँड. कैलास शेवाळे.

3. या घटनेला राजकीय वळण मिळाले आहे का?
होय, या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

4. जिल्हा बँकेवर नेमकी टीका का होत आहे?
वार्षिक अहवालात विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचा फोटो न छापल्यामुळे.

5. हा वाद कुठल्या स्तरावर सुरू झाला आहे?
जिल्हा बँकेच्या प्रशासन व स्थानिक राजकारणाच्या पातळीवर.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT