Shantgiri Maharaj  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Lok Sabha Election 2024: नाशिकमध्ये नवा ट्विस्ट, शांतिगिरी महाराजांनी भरला शिवसेना शिंदे गटाचा अर्ज

Political News : नाशिक मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारीच्या वादात सोमवारी नवा ट्विस्ट आला आहे. शांतिगिरी महाराज यांनी आज मिरवणुकीने जात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला

Sampat Devgire

Shivsena News : नाशिक मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारीच्या वादात सोमवारी नवा ट्विस्ट आला आहे. शांतिगिरी महाराज यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या इच्छुकांना मोठा राजकीय धक्का बसला आहे.

महायुतीचा नाशिक मतदारसंघातील उमेदवार कोण? यावरून गेले दोन आठवडे वाद सुरू आहे. मात्र अद्यापही उमेदवार ठरलेले नाही. उमेदवार ठरविण्याचे अंतिम प्रक्रिया सुरू आहे. अशातच शांतिगिरी (Shantgiri Maharaj) यांनी सर्व राजकीय पक्ष आणि इच्छुकांना मोठा धक्का दिला आहे. शांतिगिरी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेना (Shivsena) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट असा अर्ज दाखल केला आहे. या अर्जासोबत पक्षाचा एबी फॉर्म जोडलेला नाही. (Nashik Lok Sabha Election 2024)

या संदर्भात शांतिगिरी महाराज यांचे समन्वयक अरुण शेठ पवार यांनी महाराजांनी आज शिवसेना शिंदे गटातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या संदर्भात आमची वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाली आहे. पक्षाने आम्हाला एबी फॉर्म देण्याचे मान्य केले आहे. येत्या एक-दोन दिवसांत पक्षाकडून एबी फॉर्म मिळेल. त्यामुळे आम्ही अर्ज दाखल केला असे सांगितले.

नाशिक मतदारसंघात युतीच्या उमेदवाराचा मोठा वाद आहे. विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी उमेदवारी मिळेल, असा दावा केला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांचा प्रचारदेखील सुरू आहे. मात्र, यावर महायुतीच्या घटक पक्षांमध्ये मोठा वाद आहे. या वादातूनच उमेदवारीचा निर्णय घेण्याचा विषय लांबला आहे. आज याबाबतची प्रक्रिया अपेक्षित आहे. त्याआधीच शांतिगिरी यांनी अर्ज दाखल केल्याने राजकीय कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. शांतिगिरी यांनी यापूर्वी शुक्रवारी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनीदेखील शांतिगिरी यांच्या उमेदवारी अर्जाबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यांचे कोणाशी बोलणे झाले आणि काय चर्चा झाली, याबाबत आपल्याला कुठलीही माहिती नाही. आमचा उमेदवार तयार आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत याबाबतचा निर्णय होईल. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचा नाशिक मतदारसंघातील उमेदवार जाहीर होईल, असा दावा त्यांनी केला.

(Edited by : Sachin Wgahmare)

R

SCROLL FOR NEXT