Ahmednagar News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar Politics: नगर शहरात सुविधांचा बोजवारा; सेनेकडून आयुक्तांना कंदील भेट, तर मनसेकडून चिखलात खुर्ची टाकून निषेध

Ahmednagar News: अहमदनगर शहरात रस्त्याची दुरावस्था

सरकारनामा ब्यूरो

राजेंद्र त्रिमुखे :

Ahmednagar News: अहमदनगर शहर सध्या विविध कारणांनी राज्यभर गाजत आहे. शहरातील टोळी गुंडाराज आणि त्यातून सशस्त्र हल्ले आणि हत्या, अशा घटना आणि शहरातील खड्डेमय झालेले रस्ते याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज शिवसेना (ठाकरे गट) युवा सेनेचे राज्य सचिव विक्रम राठोड यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी नगर महापालिकेच्या आयुक्तांना कंदील भेट देत शहरातील सुविधांचा उडालेल्या बोजवाऱ्याचा निषेध व्यक्त केला.

नगर शहरातील मोठ्या वर्दळीच्या प्रोफेसर कॉलनी चौकातील बंद पडलेले पथदिवे तात्काळ सुरु करण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने आयुक्तांना कंदील भेट देण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) शहर जिल्हाध्यक्ष आणि माजी महापौर अभिषेक कळमकर हे देखील उपस्थित होते. याबरोबरच माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरिष ज़ाधव, नगरसेवक योगीराज गाडे, दत्ता जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मनसेकडून चिखलात खुर्ची टाकून निषेध

रस्त्यावरील खड्डे अनेकदा मागणी करूनही बुजावण्यात येत नाहीत. तसेच रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याचा निषेध करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये खुर्ची टाकून त्यावर आयुक्त असे नाव लिहून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. हे आंदोलन मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुसारे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केले. शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता पुरस्कार देणार्‍यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही भुतारे यांनी यावेळी केली.

एकीकडे शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार संग्राम जगताप यांनी बायपास, सीना नदी पूल, माळीवाडा बसस्थानक यासाठी कोट्यावधींचा निधी मंजूर झाल्याचे सांगितले. मात्र, दुसरीकडे महानगरपालिका किरकोळ काही लाखांचे कामेही पूर्णत्वास नेत नसल्याने नागरीकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT