Aaditya Thackeray in Nashik Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Aaditya Thackeray news : मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेले शहर हेच का? आदित्य ठाकरेंनी नाशिकमधील रस्त्यांच्या दुरावस्थेचा मुद्दा आणला ऐरणीवर

Nashik road condition, Devendra Fadnavis, Nashik infrastructure : नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीवर आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्नचिन्ह.

Sampat Devgire

Shivsena UBT News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी गुरूवारी नाशिकला भेट दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि कुंभमेळा मंत्री यांच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शहराच्या दुरावस्थेला भाजपला जबाबदार धरले. यावेळी त्यांनी नाशिक शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेविषयी संताप व्यक्त केला. रस्त्यांची अवस्था पाहता जिथे मी जातो तिथे आधी दुरुस्तीसाठी जेसीबी पाठवला जातो, असा चिमटा त्यांनी घेतला.

नाशिक शहरातील समस्या आणि दुरावस्था पाहता येथे उद्योग थांबतील कसे? असा प्रश्न ठाकरे यांनी केला. रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी प्रशासन कसे काम करते हे जनता पाहते आहे. हा सर्व नागरिकांचा पैसा आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. शहराची अवस्था पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेले शहर हेच का? असा गंभीर प्रश्न निर्माण होतो. अशी स्थिती असेल तर मुख्यमंत्र्यांनी शहर दत्तक घ्यावे का? हा प्रश्न निर्माण होतो. यानिमित्ताने आमदार ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर टीका केली.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विविध विकासकामांच्या सुमारे 600 कोटींच्या कामांच्या बनावट वर्क ऑर्डर काढण्यात आल्या. त्यातून कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाली. या प्रकरणात कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या निकटवर्ती यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधले. गेल्या कुंभमेळ्यात सुद्धा फडणवीस हेच मुख्यमंत्री होते. गिरीश महाजन हे मंत्री होते. त्यामुळे हा कारभार कसा सुरू आहे हे स्पष्ट होते, अशी टीका ठाकरेंनी केली.

भाजपला कुंभमेळा करायचा नाही तर पैसे कमवायचे आहे. बनावट वर्क ऑर्डर प्रकरणात हाती लागलेले छोटे मासे आहेत. त्याहून मोठे लोक अद्याप पडद्यामागे आहेत. त्यांचा सत्ताधाऱ्यांची संबंध आहे की नाही हे लवकरच स्पष्ट होईल. नाशिक नंतरचा कुंभमेळा उज्जैन येथे होत आहे. तेथे 80 टक्के कामे पूर्ण झाली आहे. अनेक सुविधा व विकास कामांचे नियोजन करण्यात आले आहे. नाशिकमध्ये मात्र काँक्रिटीकरण आणि रस्ते यांची स्थिती पाहता नियोजन कसे आहे, याची जाणीव होते, असे ठाकरे म्हणाले.

शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नांवर आदित्य ठाकरे यांनी महापालिका आयुक्त आणि महापौरांनाही टीकेचे लक्ष केले. सरकार आणि सत्ता बदलत असते. त्यामुळे आयुक्तांनी कोणतेही निर्णय आणि आश्वासन देण्यापूर्वी त्याची जाणीव ठेवावी. संजय राऊत 17 ऑगस्टला शहरात मोर्चा काढणार आहेत. नागरिकांनी आणि महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी त्या मोर्चात सहभागी व्हावे, असे खोचक आवाहनही ठाकरेंनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT