Aaditya-Thackeray-devendra-fadnavis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Aaditya Thackrey Politics: लाडकी बहिण योजना रद्द होणार?, आदित्य ठाकरे यांनी सांगितला भाजपचा 'तो' प्लॅन!

Aaditya Thackrey; Shivsena leader Aaditya Thackeray expressed fears about "Ladki Bhahin" scheme -लाडकी बहीण योजना गुंडाळण्यासाठी सत्ताधारी भाजपने डावपेच आखले असून लवकरच ही योजना गुंडाळण्याची भिती आहे.

Sampat Devgire

Aaditya Thackrey news: महायुती सरकारसाठी लाडकी बहीण योजना गळ्याचा फास होऊ लागली आहे. या योजनेमुळे हे सरकार सातत्याने विरोधकांचे टार्गेट झाले आहे. त्यामुळे ही योजना किती काळ चालणार, अशी अटकळ लढविली जात आहे.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे. लाडकी बहीण योजना गुंडाळण्यासाठी भाजप डावपेच आखत आहेत. या डावपेचंतूनच ते आपली सही सलामत सुटका करून घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे डावपेच कोणते याविषयी मोठी उत्सुकता आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, 'लाडकी बहीण' योजना मोठ्या उत्साहाने जाहीर केली. मात्र त्याबाबतचे कोणतेही नियोजन महायुती सरकारकडे नाही. हे आता सगळ्यांना कळले आहे. त्यामुळे या सरकारची मोठी तारांबळ उडत आहे. हे सर्व करताना लाडक्या बहिणींना अनुदान देण्याबाबत अडचणी सांगितल्या जात आहेत. आतापर्यंत आठ लाख महिलांना त्यातून वगळले आहे.

भारतीय जनता पक्ष आपल्याच एखाद्या पाठीराख्यामार्फत उच्च न्यायालयात याचीका दाखल करण्याची शक्यता आहे. या याचिकेद्वारे लाडकी बहीण योजना बंद करावी, अशी मागणी करण्यात येईल. सरकार त्याबाबत तांत्रिक मुद्दे पुढे करील. उच्च न्यायालयामार्फत ही योजना बंद करण्याचा पर्याय स्वीकारला जाऊ शकतो, असे ते म्हणाले.

राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. महायुतीचे सरकार मोठ्या बहुमतासह सत्तेवर आले. शंभर दिवसांचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. खरे तर हा सत्तेत आल्यावर हनिमून पिरियड समजला जातो. मात्र हे सरकार विविध वादग्रस्त विषय पुढे करून सरकारच्या कामकाजापासून लोकांचे लक्ष विचलित करीत आहे.

गेल्या शंभर दिवसात शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली होती, त्यावर काही झाले का? असा प्रश्न त्यांनी केला. महिलांवर अत्याचार वाढत आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यावर काही उपाय झाला आहे का? बेरोजगार, विद्यार्थी, महिला यापैकी कोणासाठी तरी सरकारने कोणती योजना आणली का? त्यामुळे हे सरकार अपयशी आहे अशी टीका त्यांनी केली.

-------

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT