Nashik News : साखरपुड्याच्या दिवशी समजले होणाऱ्या बायकोचे प्रेमसंबंध; नाशिकमध्ये आयकर अधिकाऱ्याने संपवलं जीवन

Nashik Marriage Fraud News : साखरपुड्याच्या कार्यक्रमातच मुलीने तीच्या प्रियकराला मिठी मारली. तिथेच तिचे त्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याचे आयकर अधिकारी असलेल्या पांडे यांना समजले.
Nashik Marriage Fraud News
Nashik Marriage Fraud NewsSarkarnma
Published on
Updated on

Nashik Latest News : नाशिकमध्ये आयकर कार्यालयात कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याचे उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे एका युवतीसोबत लग्न ठरले होते. वाराणसी येथे त्यांचा साखरपुडा झाला, साखरपुड्याच्या कार्यक्रमात नवरीने तिच्या प्रियकराला मिठी मारल्याने तीचे प्रेमसंबंध उघड झाले. त्यानंतर आयकर अधिकारी प्रचंड तणावात आला व पुढे जे घडलं ते धक्कादायक आहे.

हरेकृष्ण पांडे असे या आयकर अधिकाऱ्याचे नाव असून तो नाशिक येथे आयकर कार्यालयात कार्यरत होता. त्याच्या लग्नासाठी वधू शोध मोहीम सुरु होती. दरम्यान उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील एका मुलीसोबत त्याचे लग्न जमले. वाराणसी येथे त्यांच्या साखरपुड्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. साखरपुड्याच्या कार्यक्रमातच मुलीने तीच्या प्रियकराला मिठी मारली. तिथेच तिचे त्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याचे पांडे यांना समजले.

Nashik Marriage Fraud News
Nashik Satpir Dargah : नाशिकमध्ये तणावपूर्ण शांतता...'या' कारणांमुळे दगडफेक पूर्वनियोजित असल्याचा संशय बळावला

त्यानंतर 'लग्न कर नाहीतर हुंडा प्रकरणात अडकवेल' अशा धमक्या मुलीने पांडे यांना दिल्या. वैफल्यग्रस्त व तणावात येऊन इन्कमटॅक्स अधिकारी असलेल्या नवरदेवाने लग्नाच्या दिवशीच गळफास घेऊन आत्महत्या केली. वाराणसी येथे आज (दि. 18) त्यांचा विवाह नियोजित होता. मात्र, लग्न होण्यापूर्वी लग्नाच्या दिवशीच त्याने आयुष्याचा शेवट केला. या घटनेनंतर नाशिकमध्ये मात्र एकच खळबळ उडाली आहे.

बायको होणाऱ्या युवतीकडून सतत ब्लॅकमेल आणि मानसिक त्रास होत असल्याने आयकर अधिकारी असलेल्या तरुणाने हे टोकाचा पाऊल उचलले. याप्रकरणी नवरीसह तीचा प्रियकर आणि अन्य संशयिताविरोधात नाशिकच्या अंबड पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृ्त्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरेकृष्ण पाण्डेय याचा वारणसी येथील मोहिनी नावाच्या मुलीसोबत साखरपुडा झाला होता. या कार्यक्रमात मोहिनीचा प्रियकर असलेल्या सुरेश पाण्डेय याने तिला मिठी मारली होती. त्यानंतर तीचे प्रेमसंबंध उघड झाल्याने हरेकृष्ण तणावात होता. त्यानंतर त्यांच्या लग्नाची तारीखही ठरली होती.

Nashik Marriage Fraud News
Jalgaon Crime: पोलीस अधिकारीच निघाला चोरांच्या टोळीचा बॉस, जालन्याला ड्युटी, जळगावला करायचा चोऱ्या!

हरेकृष्ण याने मोहिनीला फोन करुन प्रियकराला तू सोडून दिल्यास मी तुझ्याशी लग्न करेल अशी अशी तयार त्याने दर्शवली होती. मात्र तीने प्रियकराला सोडण्यास नकार दिला. याउलट हरेकृष्ण व त्याच्या कुटुंबियांना हुंडा मागितल्याच्या प्रकरणात अडकवेल अशी धमकी दिली. त्यातून तणावात येऊन त्याने उत्तमनगर येथे गळफास घेत आत्महत्या केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com