AAP, Paper Lead Issue Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

AAP Andolan : पेपरफुटीवरून 'आप' आक्रमक; राज्यभर करणार 'आक्रोश' आंदोलन

Pradeep Pendhare

Ahmednagar Politial News :

नोकरभरतीमध्ये गोंधळ आणि पेपरफुटीच्या निषेधार्थ आम आदमी पक्षाने नगर शहरात न्यू आर्टस्, कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयासमोर निदर्शने केली.

यावेळी 'आप'च्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करुन नोकरभरती परीक्षेत झालेल्या पेपरफुटी प्रकरणी कोर्टाच्या देखरेखीखाली विशेष चौकशी समिती स्थापन करुन चौकशी करण्याची मागणी केली.

राज्यात जवळपास सर्वच स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटण्याचे प्रकार वाढतच चालले आहे. पेपरफुटी (Paper Leak Issue) प्रकरणात आम आदमी पक्षाने आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांनी आंदोलन केल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांनी कारवाईसाठी कुठलेही ठोस आश्‍वासन दिले नाही. यामुळे आम आदमी पक्षाने (Aam Aadami Party) राज्यभर आक्रोश आंदोलन करून राज्य सरकारचे लक्ष वेधले.

सरकारी नोकरीसाठी स्पर्धा परीक्षांची (Competitive Exam) तयारी करणाऱ्या युवकांची पेपरफुटीमुळे मोठी फसवणूक होत आहे, असा आरोप प्रा. अशोक डोंगरे यांनी केला आहे. या अनागोंदी कारभाराने युवकांचे भविष्य अंधकारमय बनले असून, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवकांनी कोणाकडे न्यायाची अपेक्षा ठेवावी? हा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. पेपरफुटीचे प्रकरण यापुढेही सुरू राहिल्यास 'आप' राज्यभर गंभीर आंदोलन करेल, असा इशारा यावेळी डोंगरे यांनी दिला.

या आंदोलनात आम आदमी पक्षाचे समन्वयक प्रा.अशोक डोंगरे, शहर जिल्हाध्यक्ष भरत खाकाळ, संघटन मंत्री महेश शिंदे, महासचिव दिलीप घुले, उपाध्यक्ष गणेश मारवाडे, कला सांस्कृतिक आघाडी अध्यक्ष प्रकाश वडवणीकर, रिक्षा आघाडी उपाध्यक्ष गणेश शिंदे आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पेपरफुटीतील गुन्हेगारांना जन्मठेप द्या!

सदोष तलाठी भरतीची परीक्षा रद्द करून, तलाठी तसेच सर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत घ्यावात. नोकरभरती परीक्षेत झालेल्या पेपरफुटीची चौकशी करण्यासाठी ताबडतोब कोर्टाच्या देखरेखीखाली विशेष चौकशी समितीची स्थापना करा आणि पुढील 45 दिवसांत समितीला अहवाल सादर करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी 'आप'ने केली आहे.

पेपरफुटीच्या विरोधात कठोर कायदे बनवावेत. सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण कायमचे रद्द करावे. पेपरफुटीतील गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा आणि 10 कोटी रुपयांचा दंड आकारण्याचा कायदा करण्याची मागणी 'आप'ने केली आहे.

(Edited by Avinash Chandane)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT