BJP Maharashtra latest : 'कॉक्रोच जनता पक्ष' या उपहासात्मक आंदोलनाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी भाजपकडून पक्षात येण्याची ऑफर देण्यात आली होती, तसेच नकार दिल्यास ठोकून काढण्याची धमकी मिळाल्याचा दावा केला होता.
या दाव्यावर राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट प्रतिक्रिया देत, आरोप करणाऱ्यांनी संबंधित व्यक्तींची नावं जाहीर करावीत, असे आव्हान दिले आहे.
विखे पाटील म्हणाले (Radhakrishna Vikhe Patil), "माध्यमांसमोर बोलत असताना संदिग्ध आरोप करण्यापेक्षा धमकी कोणी दिली, ऑफर कोणी दिली हे स्पष्ट सांगितले पाहिजे. पुराव्याशिवाय भारतीय जनता पक्षाची बदनामी करणे योग्य नाही. कोणाच्याही राजकीय खेळाला बळी पडू नये."
पेपरफुटीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) मंजूर केलेल्या विधेयकाचे स्वागत करताना विखे पाटील म्हणाले की, "केवळ नीटच नव्हे, तर इतर स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी रोखण्यासाठीही या कायद्याचा प्रभावी उपयोग होईल. त्यामुळे अशा विषयांवर बेजबाबदार विधाने करणे योग्य नाही."
छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलताना अभिजित दिपके यांनी भाजपकडून पक्षप्रवेशाची ऑफर आणि धमक्या मिळाल्याचा दावा केला. "नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नातवाच्या वयाचा मी आहे. 30 वर्षांच्या मुलाला किती धमक्या देणार?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
याचवेळी योगगुरू बाबा रामदेव यांनी 'Gen-Z' संस्कृतीवर केलेल्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. "आमच्या हक्काच्या मागण्यांसाठी लढणे जर बदनामी असेल, तर ते आम्ही पाहून घेऊ. रामदेवबाबांनी त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीवर लक्ष द्यावे," असा टोला दिपके यांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.