

Balasaheb Thorat vs Amol Khatal : एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदाराभोवती न्यायालयीन अडचणी वाढल्या आहेत. संगमनेर आमदार अमोल खताळ यांनी निवडणूक लढताना, प्रतिज्ञापत्रात चुकीची आणि अपूर्ण माहिती दिल्याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात खटाल सुरू चालणार आहे.
या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेल्या आमदार खताळ यांची विशेष अनुमती याचिका फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आमदार खताळ यांच्याविरोधात उच्च न्यायालयात कायदेशीर खटला चालण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी आमदार खताळ यांच्याविरोधात न्यायालयात खटला दाखल केला आहे. विधानसभा निवडणुकीत खातळ यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली व्यावसायिक भागीदारी, उत्पन्न आणि कराची थकबाकी लपवल्याचा आरोप थोरात यांनी केला आहे.
नीलकमल नावाची भागीदारी संस्था असून, त्याचा 54 हजार रुपयांचा व्यावसायिक कर थकीत होता. ही माहिती प्रतिज्ञापत्रात लपवण्यात आल्याची तक्रार आहे. यावर शिवसेनेचे (Shivsena) आमदार खताळ यांनी या फर्मचे आपण भागीदार नसून, ती विसर्जित झाली आहे, असा दावा केला आहे. मात्र, जीएसटी स्थळावरील संकेत नोंदी सादर करत, ही फर्म अद्याप सक्रिय असल्याचा न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
थोरात यांच्या या तक्रारीविरोधात उच्च न्यायालयात आमदार खताळ यांनी धाव घेतली होती. परंतु न्यायमूर्ती किशोर संत यांनी ही आमदार खताळ यांचा रद्दबादलचा अर्ज फेटाळून लावला. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आमदार खताळ यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र तिथेही दिलासा मिळाला नाही.
सर्वोच्च न्यायालयाच्या यानिर्णयानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाविरोधात नियमित सुनावणी व खटला चालणार आहे. बाळासाहेब थोरात यांचे वकील अमित कारंडे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात अशी माहिती लपवणे हा गंभीर गुन्हा आहे. या खटल्यात पुढील सहा महिन्यात निकाल अपेक्षित आहे.
थोरात आणि खताळ यांच्यातील निवडणूक राज्यात गाजली. खताळ यांनी थोरातांवर केलेली मात राज्यभर गाजली. परंतु आता आमदार खताळ हे कायदेशीर कचाट्यात अडकले आहेत. येथे कोण कोणावर मात करतो, याकडे आता लक्ष असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.