Ahilyanagar crime news : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर अभिषेक कळमकर याने पारनेरमधून पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रकार समोर आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांच्या पथकाने सोमवारी राळेगणसिद्धी-पारनेर रस्त्यावर अभिषेक कळमकर असलेल्या संशयावरून एका वाहनाचा पाठलाग केला होता.
परंतु चालकाने पारनेर शहरात वाहन घुसवले, त्याचवेळी वाहनातून दोघे उतरून पसार झाले. त्यातील एकाला पकडले, तर दुसरा पसार झाला. पकडला त्याचे नाव लक्ष्मण भाऊसाहेब कळमकर ऊर्फ लकी (वय 30, रा. पळवे बुद्रुक, ता. पारनेर) असे आहे. अहिल्यानगर पोलिस पथक या दोघा पसारांच्या मागे लागले असतानाच, चालक वाहन घेऊन बेपत्ता झाला. दरम्यान, पारनेर पोलिस ठाण्यात वाहन चालकाविरोधात याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
अभिषेक कळमकर (Abhishek Kalamkar) याने, एका युवतीला नोकरी लावून देतो, या अमिषाने तिच्यावर अत्याचार केला. यानंतर पीडिताला व्हिडिओ काॅल करत तिचे शोषण सुरू ठेवले. शोषणाला बळी पडलेल्या युवतीने शेवटी अहिल्यानगरमधील एमआयडीसी पोलिस ठाण्यात 18 फेब्रुवारीलाला तक्रार दाखल केली.
या गुन्ह्याचा तोफखाना पोलिस (Police) तपास करत आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून कळमकर हा पसार झाला आहे. तोफखाना पोलिसांबरोबर स्थानिक गुन्हे शाखा पोलिस समांतर तपास करत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथक कळमकर याचा शोध घेत आहेत. यातच कळमकर याचा जिल्हा न्यायालयाने काल जामीन फेटाळला आहे.
याच दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना कळमकर अहिल्यानगर जिल्ह्यात आल्याची माहिती मिळाली होती. एका काळ्या रंगाच्या वाहनातून (MH 12-WK 9888) पारनेरमधील राळेगणसिद्ध इथं येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांना पनोली इथं सापळा लावला. पोलिसांना वाहन येताच दिसताच सापळा आवळला.
वाहन चालक आणि वाहनातील असलेल्या दोघांना हे पोलिस असल्याचे कळल्यावर, त्याने चालकास वाहन पळवण्यास सांगितले. चालकाने वाहन हे पारनेर शहराच्या दिशेने नेले. पोलिस पथक देखील त्याच्या मागावर होते. पारनेर शहरात वाहन घुसताच, वाहनातून दोघे उतरून पसार झाले.
पोलिसांनी त्यातील एकाला पाठलाग करून लक्ष्मण भाऊसाहेब कळमकर ऊर्फ लकी (रा. पळवे बुद्रुक, ता. पारनेर) याला पकडले. पण दुसरा पसार झाला. जो पसार झाला. तो अभिषेक कळमकर असल्याचा पोलिसांना संशय आहे. लक्ष्मण ऊर्फ लकी हा अभिषेकचा नातेवाईक असून, पोलिसांनी त्याच्याकडे दुसरा पळाला तो कोण आहे, याची चौकशी केली. परंतु त्यावर लकी तोंड उघडलेलं नाही. याच गोंधळाचा फायदा घेत, चालक वाहन घेऊन पसार झाला.
पोलिसांना मात्र त्याने चौकशीत, अभिषेक कळमकर यास शिरुर इथल्या एका हॉटेलवर त्याच्या नावाने रूम बुक करून दिली होती. तसेच अभिषेक कळमकर याच्या सांगण्यावरून गुन्ह्यातील फिर्यादीस सदर हॉटेलमधील रुममध्ये सोडल्याचे सांगितले आहे. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी लक्ष्मण ऊर्फ लकी याला तोफखाना पोलिसांकडे वर्ग केलं आहे.
दरम्यान, वाहनाच्या पाठलागाचा थरार सोमवारी राळेगण सिध्दी ते पारनेर रोडवर रंगला होता. पोलिसांनी इशारा करून देखील आणि लोकांच्या गर्दीत भरधाव वेगाने MH 12-WK 9888 क्रमांकाचे वाहन चालवले म्हणून, वाहनावरील चालकाविरोधात पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. पोलिस कर्मचारी भगवान थोरात यांनी फिर्याद दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.