Sakharam Thackeray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

ACB Trap News : नडलेल्या कर्जदाराकडून घेतली ५ लाखांची लाच!

ACB arrest cooperative officer for five lacs bribe.-पतसंस्थेच्या अवसायकाला पाच लाखांची लाच घेताना अटक एसीबी पथकाने अटक केली.

Sampat Devgire

Dhule News : लाच स्विकारण्याचे प्रकार थांबण्याचे नावच घेत नाहीत. नाशिकच्या एसीबी पथकाने गेल्या सहा महिन्यात दिडशेहून अधिक जणांवर याबाबत कारवाई केली आहे. शुक्रवारी धुळे येथे सहकार विभागाच्या अवसायकास ५ लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली. (ACB traped a officer of cooperative society`s administrater in bribe case)

धुळे (Dhule) येथील अवसायनात गेलेल्या पतसंस्थेच्या कर्जदाराला त्रास देत सहकार (Cooperative) विभागाच्या अवसायकाने पाच लाखांची लाच (ACB) घेतल्याने त्यांना पोलिसांनी अटक केली.

आर्थिक डबघाईस असलेल्या येथील महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या ताब्यात असलेल्या सावदा येथील नगरपालिकेच्या गाळ्यासंदर्भात पाच लाख रुपयांची लाच धुळे येथे स्वीकारताना पतसंस्थेच्या अवसायकास शुक्रवारी धुळे येथे अटक करण्यात आली. येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेवर प्रशासक म्हणून सखाराम कडू ठाकरे यांची नियुक्ती केलेली होती. या पतसंस्थेच्या सावदा पालिकेच्या अंतर्गत असलेल्या व्यापारी संकुलातील गाळ्याच्या मालकाने कर्ज थकीत केल्याने हा गाळा पतसंस्थेने जप्त केला होता.

गाळामालकाने कर्जफेडीची प्रक्रिया पूर्ण केल्यावरही संबंधित गाळा आणि त्याची अनामत रक्कमही त्याच्या नावावर करून देण्यासाठी सखाराम ठाकरे यांनी गाळा मालकाकडे पाच लाख रुपयांच्या रकमेची मागणी केली होती.

गाळामालकाने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने शुक्रवारी पहाटे सखाराम ठाकरे (वय ५६, रा. ११, राधेय को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी, पाचोरा) यांना धुळे येथे लाच घेताना ताब्यात घेतले. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्याविरुद्ध धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे निरीक्षक हेमंत भेंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली रूपाली खांडवे व सहकारी राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा यांच्या पथकाने केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT