Devidas Pingle News : बाजार समितीत शेतमालाची विक्री केल्यावर शेतकऱ्यांची फसवणूक होण्याचे प्रकार नवे नाहीत. मात्र नाशिकच्या बाजार समितीत शेतकऱ्यांना फसवणाऱ्या व्यापाऱ्याला सभापतींकडून चांगलाच धडा शिकवण्यात आला आहे. (APMC Chairman taught a lesson to merchant of Nashik)
एका अडतदाराने टोमॅटोच्या मालापोटी १९६ शेतकऱ्यांचे दोन ते सव्वादोन कोटी रुपये थकविले होते. शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींवरून बाजार समिती प्रशासनाने संबंधित अडत्याच्या गाळ्याचा ४४ लाख रुपयांना लिलाव केला. त्यातून ४५ शेतकऱ्यांना थकबातील २० टक्के रक्कम परत करण्यात आली.
इन्कलाब व्हेजिटेबल कंपनीचे प्रोप्रायटर नौशाद फारुकी, शमशाद फारुकी यांना टोमॅटो विभागात गाळा क्रमांक १५१ हा ९९ वर्षांच्या कालावधीसाठी देण्यात आलेला होता. या अडत्याने जिल्हाभरातील जवळपास १९६ शेतकऱ्यांकडून टोमॅटो हा शेतीमाल वेळोवेळी घेतला आणि त्यांची शेतीमाल विक्रीची जवळपास दोन कोटी रुपये रक्कम थकविली.
कष्टाचे पैसे मिळाल्याने शेतकऱ्यांनी सभापती देवीदास पिंगळे व संचालक मंडळासह सचिव व बाजार समिती प्रशासनाचे आभार मानले आहेत.
या वेळी सभापती पिंगळे, उपसभापती उत्तमराव खांडबहाले, संचालक संजय तुंगार, तानाजी करंजकर, विनायक माळेकर, जगन्नाथ कंटाळे, प्रल्हाद काकड, हमाल मापारी प्रतिनिधी चंद्रकांत निकम, व्यापारी प्रतिनिधी जगदीश अपसुंदे तसेच मनमाडचे माजी आमदार तथा मनमाड बाजार समितीचे सभापती संजय पवार उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.