येवला : समाजात (Community) धर्माच्या नावाने काही लोक भयंकर तणावग्रस्त (Creating tension) स्थिती निर्माण करत आहेत. दोन समाजात दुही आणि तेढ निर्माण करण्याच्या या प्रकारामुळे कटुता निर्माण होऊन हा अखंड देश दुभंगणायाची स्वप्ने पाहणाऱ्यांची ही मनीषा कधीच पूर्ण होणार नाही. कारण हजारो सैनिक राष्ट्रसेवा दल या बिनभिंतीच्या शाळेत संस्कारित होत आहेत, असा विश्वास पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे (Dr Sudhir Tambe) यांनी व्यक्त केला.
येथील मायबोली निवासी कर्णबधिर विद्यालयात सुरू असलेल्या जिल्हा राष्ट्रसेवा दलाच्या दस्ता नायक शिबिराचे उद्घाटन डॉ. तांबे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य राष्ट्रसेवा दलाचे कार्याध्यक्ष अर्जुन कोकाटे अध्यक्षस्थानी होते.
डॉ. तांबे म्हणाले, की आज काळ अवघड असल्याचे दिसत असला तरी या काळात धैर्याने उभे राहण्याची गरज आहे. निराश न होता या सांस्कृतिक लढाईला अहिंसेच्या मार्गानेच आपल्याला तोंड द्यावे लागणार आहे. कधी नव्हे ती आज पुरोगामी परिवर्तनवादी विचारांच्या मुशीत तयार झालेल्या कार्यकर्त्यांची नितांत गरज भासत आहे. ती गरज राष्ट्रसेवा दल या संघटनेमुळे पूर्ण होईल. या संघटनेचे कार्यकर्ते फार प्रामाणिक आणि वैचारिकदृष्ट्या परिपक्व असतात. तुम्हीही तुमची अशीच जडणघडण पक्की करावी, असे आवाहनही तांबे यांनी केले.
प्रा. अर्जुन कोकाटे म्हणाले, की राष्ट्रसेवा दल ही लोकशाही, समाजवाद, राष्ट्रवाद, विज्ञाननिष्ठा, समता, न्याय, बंधुता ही भारतीय संविधानातील शाश्वत मूल्ये समाजात रुजविण्यासाठी कटिबद्ध असलेली संघटना आहे. दैनंदिन शाखा, शिबिरे,अभ्यास मंडळे, कलापथक, संविधान चौक आदी उपक्रमांच्या माध्यमातून वैचारिकदृष्ट्या परिपूर्ण अशी कार्यकर्त्यांची फळी उभी असून, समाजातील अनेक आव्हाने पेलीत मार्गक्रमण करीत आली आहे. आताही धर्मांध, जातीय, विघातक शक्ती समाजात जी झुंडशाही निर्माण करीत आहे, त्याविरुद्ध रस्त्यावर उतरून वैचारिक लढाई लढण्यासाठी राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते तयार होत असल्याचेही प्रा. कोकाटे यांनी सांगितले.
राष्ट्रसेवा दलाचे जिल्हा कार्याध्यक्ष दिनकर दाणे यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी संगमनेर तालुका राष्ट्रसेवा दलाच्या कार्याध्यक्षा डॉ. सुनीता राऊत, लोकपंचायत संस्थेचे अध्यक्ष विजय थोरात आवर्जून उपस्थित होते. सुरवातीला शिबिरप्रमुख शरद शेजवळ यांनी चळवळीतील विविध गाणी, देशभक्तिपर गीते म्हणून वातावरणात नवचैतन्य आणले होते. शिबिरात नाशिक जिल्ह्यातील ८० शिबिरार्थी सहभागी आहेत. शिबिरार्थींना राष्ट्रसेवा दलाचे ज्येष्ठ प्रशिक्षक सदाभाऊ मगदूम, सांगली येथील मिलिंद कांबळे, शाहिस्ता मुल्ला, राज कांबळे प्रशिक्षण देत आहेत. रामनाथ पाटील, अझर शहा, राजेंद्र बारे, शिवाजी साताळकर, राजेंद्र जाधव, पंडित मढवाई, कानिफनाथ मढवाई, बाबासाहेब कोकाटे, उत्तम बंड, सुभाष वाघेरे संयोजन करत आहेत.
----
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.