Rakhi Sawant
Rakhi Sawant Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

राखी सावंतने नोटीस मिळताच मागितली माफी!

Sampat Devgire

नाशिक : अभिनेत्री राखी सावंतने (Rakhi Sawant) काही दिवसांपूर्वी अफ्रीकेतील ट्राईब (Tribe)असलेल्या एका जमातीचा वेष केला होता. त्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल करीत आदिवासी (ट्रायबल) वेष आहे असे म्हटले होते. अंगप्रदर्सन असलेल्या त्याबाबत पोलिसांची नोटीस मिळताच एक पाऊल मागे येत आदिवासी बांधवाची माफी (Apologize)मागितल्याने हे प्रकरण वाढण्याआधीच थांबले. प्रत्येक विषयावर आक्रमक असणाऱ्या राखी सावंतची ही माफी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

काही दिवसांपूर्वी राखी सावंत यांनी सोशल मीडिया तसेच इन्स्टाग्राम वर अंगप्रदर्शन असलेला अफ्रीकन वेषातील व्हिडिओ अपलोड केला होता. या व्हिडिओतील राखी सावंतला अनेक लाईक्स देखील मिळाल्या. मात्र हा व्हिडिओ चर्चेत येण्याआधीच वादाचा विषय बनला. त्यात अंगप्रदर्शन असून त्याला आदिवासी म्हणने योग्य नाही. त्यातून आदिवासींची बदनामी होते अशी ऑनलाईन तक्रार मुंबई पोलिसांकडे नाशिकच्या आदिवासी संघटनांनी केली. त्यावरून पोलिसांनी राखी सावंतला नोटीस देऊन पोलिसांत हजर होण्याची सूचना केली होती.

यामध्ये आदिवासींची बदनामी व देशातील आदिवासींच्या भावना दुखावल्याने आदिवासींच्या विविध संघटना व समाज आक्रमक झालेला होता असा दावा काही नेत्यांनी केला. २७ एप्रिलला राखी सावन्त यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

याबाबत सहाययक पोलीस आयुक्त सूर्यकांत बांगर यांनी तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री धनावडे यांच्या माध्यमातून अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष लकी जाधव यांसह काही प्रतिनिधींना वेळ देऊन राखी सावंत यांना नोटीस काढली. त्याची दखल घेऊन राखी सावंतने व्हिडीओ तसेच पत्राद्वारे माफी मागितली.

यासंदर्भात आदिवासी टायगर फाउंडेशनचे अध्यक्ष एम डी बागुल, आदिवासी क्रांतिकारक राया ठाकर फाउंडेशनचे अध्यक्ष कृष्णा गृहिरे यांनी याबाबत पाठपुरावा केला.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT