Adinath Maharaj Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Adinath Maharaj : तिसऱ्या अपत्याला मतदानाचा अधिकार कशाला? आदिनाथ महाराजांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा

At the RSS centenary Hindu Sammelan in Newasa Deogad, Adinath Maharaj sparked debate by saying those who give birth to a third child should not have the right to vote : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने आयोजित हिंदू संमेलनात आदिनाथ महाराज यांनी तिसऱ्या अपत्याच्या मतदानावर विधान चर्चेत आलं आहे.

Pradeep Pendhare

RSS centenary Hindu Sammelan : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने नेवासा तालुक्यातील हिंदू संमेलनात, तारकेश्वरत गडाचे मठाधिपती महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांनी तिसर्‍या अपत्यावरून मोठं विधान केलं. 'दोन अपत्यानंतर जन्मलेल्या सर्वांना मतदानाचा अधिकार देऊ नये,' असे आदिनाथ महाराज शास्त्री यांनी विधान केलं.

आदिनाथ महाराज यांच्या या विधानावर आता राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त नेवासा देवगड इथं आयोजित हिंदू (Hindu) संमेलनाच्या अध्यक्षस्थानी संघाचे जिल्हा कार्यवाह दीपक जोंधळे होते.

आदिनाथ महाराज शास्त्री म्हणाले, "संपूर्ण देशात केंद्र आणि राज्य सरकार (Government) ‘हम दो हमारे दो’चा नारा देत असले, तरी प्रत्यक्षात याची अंमलबजावणी कोण करीत आहे. कोण सर्व नियम मोडीत आहेत याकडे कुणाचेच लक्ष नाही आणि कुणाचा धाक सुध्दा राहिला नाही." पद आणि शासकीय नोकरीत याचे बंधन असले, तरी नियम तोडण्याचे प्रमाण अधिक असल्याने दोन अपत्यांच्या नंतर जन्मलेल्या सर्वांना मतदानाचा अधिकार देऊ नये, अशी सडेतोड भूमिका आदिनाथ महाराज शास्री यांनी मांडली.

पूर्वी एकमेकांना भेटल्यानंतर राम राम घातला जायचा, मागील काही वर्षांत नवीन पिढीला राम राम घालणे अशिक्षितपणाचे लक्षण वाटायचे, असे सांगून आदिनाथ महाराज यांनी अलीकडच्या काही वर्षांपासून 'जय श्रीराम' म्हणण्यात सर्वांना भूषण वाटत असल्याचे सांगताना 'शिवाजी महाराज की जय' व 'जय श्रीराम' म्हणण्यात शान असल्याचे सांगितले.

आज दिसणारे आध्यात्मिक ऐश्वर्य फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे असल्याचे सांगून आदिनाथ महाराज यांनी संस्कार, संस्कृती जपताना कौटुंबिक एकजूट जपावी, तसेच देव, देश आणि धर्मासाठी एकसंघ राहण्याचे आवाहन केले.

जिल्हा कार्यवाह जोंधळे यांनी, संघाचा इतिहास सांगताना या कार्यात आलेले अडसर आणि निर्माण केलेली आडकाठी सांगितली. संमेलनाच्या माध्यमातून समाज जागृती करताना एकोप्याचा संदेश देत असल्याचे सांगितले.

व्यासपीठावर सुखदेव महाराज मुंगसे व मतकर महाराज उपस्थित होते. सागर मुंगसे, गणेश औटी, ज्येष्ठ ग्रामस्थ बाजीराव मुंगसे, तालुका कार्यवाह सुनील सावंत, राजू कदम व अमोल अंबाडे उपस्थित होते. अरुण वांढेकर यांनी संमेलनाचा उद्देश व गृह संवाद उपक्रमाची माहिती दिली. यावेळी संघयात्रा पुस्तकाचे प्रकाशन झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT