Sagar Moholkar shooting : नीलेश घायवळनं परदेशातून ‘ऑपरेट’ केलं? सागर मोहोळकर गोळीबार प्रकरणात 'ट्विस्ट'

Police suspect Pune gangster Nilesh Ghaiwal operated the shooting plan targeting Jamkhed Sagar Moholkar in Ahilyanagar : कुख्यात गुंड पैलवान सागर मोहोळकर याच्यावरील गोळीबाराचा प्लॅन पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ याने ऑपरेट केल्याचं समोर येत आहे.
Sagar Moholkar shooting
Sagar Moholkar shootingSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar crime news : जामखेडमधील कुख्यात गुंड पैलवान सागर मोहोळकर याच्यावरील गोळीबारामागे पुण्यातीली कुख्यात गुंड नीलेश घायवळ गँग असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे. हल्लेखोरांमधील पुण्याच्या (Pune) कोथरूडमधील तिघे पसार असून, ते घायवळ गँगशी संबंधित आहेत.

मोहोळकर याच्यावरील हल्ला पूर्वनियोजीत, पाळत ठेवून करण्यात आला होता. या हल्ल्याचा ऑपरेट परदेश स्थित असलेल्या नीलेश घायवळ यानेच, केल्याची माहिती अहिल्यानगर पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूत्रांनी दिली. परदेश राहून नीलेश घायवळ अजूनही पुण्यातील त्याची गँग अ‍ॅक्टिव्ह ठेवल्याचे समोर येत आहे.

धाराशिव इथल्या भूम तालुक्यातील आंदरुड गावच्या यात्रेत गेल्यावर्षी 11 एप्रिल 2025मध्ये मोहोळकर याने घायवळ याच्या कानशि‍लात लगावली होती. यानंतर पैलवान मोहोळकर हा चर्चेत आला. मोहोळकर याने पुढे घायवळसमोर माफीनामा सादर केला. पण मोहोळकर याने गुन्हेगारी (Crime) क्षेत्रात प्रसिद्ध मिळवण्यासाठी हा प्रकार केल्याचं पुढे समोर आलं.

मोहोळकर तसा राक्षसी ताकदीचा, घायवळ याच्या कानाशिलात लगावण्यापूर्वी त्याच्यावर दोन खुनाचे गुन्हे दाखल होते. इतर अनेक गु्न्ह्यांमध्ये तो तुरुंगात आत-बाहेर करत होता. या हल्ल्यापूर्वी तो नाशिक कारागृहात होता. महिन्यापूर्वीच तो कारागृहातून बाहेर आला अन् त्याच्यावर गोळीबार झाला.

Sagar Moholkar shooting
Sagar Moholkar : मोहोळकराच्या शरीरात अजूनही चार बुलेट्स; गोळीबारानंतरचे 10 दिवस, पैलवानच्या प्रकृतीबाबत धक्कादायक अपडेट

हल्लेखोरांनी एक ना दोन, तब्बल सहा ते सात गोळ्या त्याच्यावर झाडल्या. दहा दिवसापूर्वी झालेल्या या हल्ल्यात गंभीर जखमी असलेल्या मोहोळकर याच्या शरीरात अजूनही यातील चार गोळ्या तशाच आहेत. मोहोळकर याच्यावरील हल्ला हा पूर्वनियोजन, पाळत ठेवून करण्यात आला होता.

Sagar Moholkar shooting
Abhishek Kalamkar : अभिषेक कळमकर 'त्या' वाहनात? पारनेरमध्ये पाठलागाचा थरार; शेवटी पोलिसांच्या हाती काय लागलं?

जामखेडमधून एकाला अटक

या हल्ल्यामागे, सुरवातीलाच मोहोळकर याने नीलेश घायवळ याला कानशि‍लात लगावण्याच्या प्रकरणाशी जोडलं गेलं. परंतु पुरावा नसल्याने पोलिसांनी तपासावर भर दिला अन्, यात जामखेडमधील एकाला अटक केली. यात त्याच्याकडून गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस अन् गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली. पुण्यावरून आलेले तिघे हल्लेखोर गुन्ह्यात पसार आहेत.

हल्लेखोर घायवळ गँगचे...

हे हल्लेखोर नीलेश घायवळ याच्या गँगशी संबंधित आहे. त्यामुळे या हल्ल्यामागे नीलेश घायवळच असल्याचे आता बोलले जाऊ लागले आहे. नीलेश घायवळ हा परदेशात पसार झाला आहे. त्याने तेथून आपल्या कानशि‍लात लगावल्याचा बदला मोहोळकर याच्यावर जीवघेणा हल्ला करून घेतल्याचा पोलिस अधिकाऱ्यांचा सूर आहे.

घायवळचा शोध सुरूच

नीलेश घायवळ यानेच हा हल्ला परदेशातून ऑपरेट केला आहे. अशा निष्कर्षापर्यंत वरिष्ठ पोलिस अधिकारी पोहोचले आहे. नीलेश घायवळ हा कोथरूड गोळीबार प्रकरण आणि मकोका (MCOCA) कारवाईनंतर, सप्टेंबर 2025च्या अखेरीस बनावट कागदपत्रे व पासपोर्टचा वापर करून आपल्या कुटुंबासह लंडनला पसार झाला. तो सध्या परदेशात असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

मोहोळकरविरोधात मकोकानुसार कारवाई?

दरम्यान, सागर मोहोळकर याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले. त्याला जनरल वार्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. परंतु त्याच्या शरीरात अजून चार बुलटस् तशाच आहेत. त्याच्यावर उपचार सुरू असले तरी, अहिल्यानगर पोलिसांनी त्याच्याविरोधात मकोकानुसार (MCOCA) कारवाई सुरू केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com