Eknath Shinde, Aditya Thackeray & Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Aditya Thakre politics: आदित्य ठाकरे यांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे देखील...

Aditya Thakre; CM Eknath Shinde also join BJP in scare of ED-शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आरोपांना त्याच दिवशी नाशिक शहरातून उत्तर दिले आहे.

Sampat Devgire

Aditya Thakre News: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप "बटेंगे तो कटेंगे" अशी घोषणा देत आहेत. त्याचा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला भाजपकडून फक्त लूट होत आहे, असा आरोप त्यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी नाशिकला सभा झाली. या सभेला शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी अवघ्या काही तासांतच उत्तर दिले. भाजप फक्त महाराष्ट्राची लूट करीत आहे. ही लूट आम्ही चालू देणार नाही, असा इशारा ठाकरे यांनी दिला.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी नांदगाव नाशिक आणि देवळाली अशा तीन ठिकाणी सभा घेतल्या. या सभांना चांगला प्रतिसाद लाभला. या सभेत श्री ठाकरे यांचा उपस्थितांची थेट संवाद करण्यावर भर होता. त्यामुळे या सभा चर्चेचा विषय ठरल्या.

श्री ठाकरे म्हणाले, पंतप्रधान मोदी सातत्याने महाविकास आघाडीवर आरोप करीत आहेत. ते पंतप्रधान आहेत. त्यांनी देशाबाबत काय काम केले? काय करणार? याविषयी बोलले पाहिजे. त्याचा त्यांना विसर पडला की काय, अशी स्थिती आहे. कारण त्यांनी केवळ काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीवर टीका करण्यातच आपला वेळ गमावला.

महाराष्ट्रातील जनतेची एकजूट आहे. महाराष्ट्रातील विरोधी पक्ष ही एक दिलाने काम करीत आहेत. मात्र मोदी आणि भाजपने महाराष्ट्रात फूट पाडली. येथील राजकीय पक्षांमध्ये बंडाळी माजवली.

आता भाजप नेते "बटेंगे तो कटेंगे" असे सांगत आहेत. महाराष्ट्रातील जनता आमच्यासोबत आहे. त्यामुळे ही जनता भाजपला नक्कीच धडा शिकवेल. त्याचे कारण म्हणजे भाजपने आधी बाटेंगे. बादमे काटेंगे आणि त्यानंतर लूट देंगे असे धोरण महाराष्ट्राविषयी राबवले आहे. महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांचीही अशीच अवस्था केली. त्यामुळे ही रणनीती महाराष्ट्रात जनता चालू देणार नाही.

भाजपच्या कामाचा नमुना म्हणजे अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्यांनी उभारला. तो अवघ्या सहा महिन्यात कोसळला गुजरातमध्ये सरदार पटेल यांचा पुतळा उभारला. तसेच स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांविषयी का नाही उभारले? छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आतापर्यंत का उभे राहिले नाही? याचे उत्तर भाजपने द्यावे.

महाराष्ट्रातून जे उद्योग गुजरातला पळवून नेले. त्यावर मोदींचा काय खुलासा आहे. पंतप्रधान मोदींनी सरकारी यंत्रणाचा दुरुपयोग केला, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. फक्त छगन भुजबळ ईडीच्या कारवाईला घाबरून भाजपसोबत गेले नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील ईडी ची कारवाई टाळण्यासाठीच भाजपसोबत गेले. हे सर्व जनतेला माहित आहे असे ठाकरे म्हणाले.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT