Chhagan Bhujbal Politics: पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधानापुढे नतमस्तक, आता जनता विरोधकांना भुलणार नाही!

Narendra Modi; Prime Minister Modi bowed his head on the Constitution, now people will not forget- विधानसभेच्या निवडणुकीत लोकसभेप्रमाणे विरोधकांचे फेक नॅरेटीव्ह चालणार नाही, असा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केला.
Chhagan Bhujbal & PM Narendra Modi
Chhagan Bhujbal & PM Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal: लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी संविधानाविषयी गैरसमज पसरवला. त्या निवडणुकीत विरोधकांचे फेक नॅरेटीव्ह चालून गेले. आताच्या निवडणुकीत तसे होऊ देणार नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी नाशिक येथे प्रचार सभा झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांसह विविध नेते उपस्थित होते.

यावेळी मंत्री भुजबळ यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे त्यांनी कौतुक केले. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील व राज्यातील सरकार सामान्यांच्या विकासासाठी काम करीत आहे. त्याचे परिणाम सर्वत्र दिसू लागले आहेत, असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनानुसार राज्यातील महायुतीचे सरकार काम करीत आहे. हे सरकार सर्व घटकांना न्याय देत आहे. त्यामुळे कुठलाही घटक विकासापासून वंचित राहिलेला नाही.

Chhagan Bhujbal & PM Narendra Modi
Vasant Gite politics: शिवसेनेसाठी काँग्रेसने कंबर कसली; मात्र इच्छुक उमेदवारांची अनुपस्थिती खटकली!

मंत्री छगन भुजबळ यांनी लाडकी बहीण योजनेचे कौतूक केले. राज्य शासनाने लाडकी बहीण योजना राबविली. त्याला अतिशय मोठा प्रतिसाद मिळाला आहे. लोकांमध्ये ही योजना लोकप्रिय झाली आहे. राज्यात सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा अधिक विस्तार केला जाईल. लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देण्यात येतील. त्यानंतर हळूहळू त्यात वाढ केली जाईल.

महायुतीच्या सरकारमुळे नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक कामे करण्यात आली आहेत. विविध योजना सुरू आहेत. त्यामुळे जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलतो आहे. याची जाणीव मतदारांना आहे.

त्यामुळे विरोधी पक्षांचा फेक नॅरेटिव्ह यावेळी चालणार नाही. जनता अशा अपप्रचाराला भुलणार नाही. जनतेला सर्व समजते आहे, अशी टीका भुजबळ यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केली.

Chhagan Bhujbal & PM Narendra Modi
PM Narendra Modi: काँग्रेसच्या कार्यकाळात देशात दोन संविधान; जम्मू-काश्मीरमधील 'कलम 370'च्या ठरावावरून PM मोदींचा संताप

ते म्हणाले, देशात पहिल्यांदाच जल जीवन मिशन योजनेअंतर्गत प्रत्येक गावात नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली आहे. त्यामुळे महिलांची पाण्यासाठी पायपीट थांबली. डोक्यावरचा हंडा उतरला. महिलांसाठी हे मोठे काम झाले आहे.

माझ्या येवला मतदार संघात राजापूरसह 41 गाव पाणीपुरवठा योजना आणि धुळगावसह 17 गावे पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. दोन महिन्यात ही योजना पूर्ण होईल. त्यातून सबंध येवला तालुक्याला आणि त्यातील प्रत्येक गावाला नळाद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध होईल.

यावेळी त्यांनी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, विरोधकांनी लोकसभा निवडणुकीत भाजप संविधान बदलणार आहे. असा खोटा प्रचार केला. त्याला मतदार भूलेले. मात्र आता तसे होणार नाही. संविधान बदलण्याची भाषा विरोधकांनी गेल्या निवडणुकीत केली.

या अपप्रचारानंतरही जनतेने पंतप्रधान मोदी यांना तिसऱ्यांदा सत्तेत विराजमान केले आहे. तिसऱ्यांदा सत्तेत येताना पंतप्रधान मोदी यांनी संविधानावर डोके ठेवले. ते संविधाना पुढे नतमस्तक झालेले सगळ्यांनी पाहिले. त्यामुळे आता राहुल गांधी यांनी संविधान दाखवून निवडणुकीत भाषणे केली तरीही जनता त्या प्रचाराला बळी पडणार नाही, कारण त्यांना सर्व कळते आहे.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com