Aditya Thackeray & Devendra Fadanvis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Aditya Thackrey Politics: आदित्य ठाकरे यांनी सांगितली भाजपची धक्कादायक जादू, म्हणाले...

Aditya Thakre; Narendra Modi and BJP leaders are fraud, they said 15 lacs and given 1500 rupees-भारतीय जनता पक्ष आणि त्याचे सर्व नेते केवळ सत्तेसाठी जनतेची दिशाभूल करतात. हा पक्ष जनतेला मूर्ख बनवणारा पक्ष असल्याने त्यापासून सावध रहावे.

Sampat Devgire

Aditya Thackrey News: शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपचे कारनामे कसे आहेत, याचे एक उदाहरण निवडणूक प्रचारात सांगितले. भाजप सत्तेसाठी काय करील याचा नेम नाही, असे ते म्हणाले.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची देवळाली कॅम्प येथे सभा झाली. महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार योगेश घोलप यांच्या प्रचारासाठी ही सभा होती. या सभेत ठाकरे भाजपची काळी जादू उपस्थितांपुढे मांडली.

श्री ठाकरे म्हणाले, भाजप हा जादू करणारा पक्ष आहे. सामान्य नागरिकांना तो असे काही भ्रमित करतो की, जनतेला आपण फसलो आहोत, याची जाणीव देखील होत नाही. असाच एक प्रकार नुकताच घडला आहे. मात्र जनतेला ते कळलेच नाही, असा दावा त्यांनी केला.

श्री ठाकरे पुढे म्हणाले, 2014 हे वर्ष आठवून पहा. तेव्हा भाजप सत्तेत आला होता. सत्तेत येण्यासाठी त्यांनी 15 लाख रुपये देणार, अशी घोषणा केली. मतदारांनी त्याला भुलून भाजपला मतदान केले. ते सत्तेत आले.

आता दहा वर्षांनी ते महिलांना पंधराशे रुपये देत आहेत. 15 लाखाचे थेट पंधराशे केले. ते आणखी पैसे देण्याची घोषणा करत आहेत. मात्र सावध रहा. सत्तेवर आल्यावर ते तुमच्यासाठी पंधरा-वीस रुपयांचा चेक काढतील. शेजारच्या राज्यात त्यांनी असेच तीनशे रुपयाचे चेक वाटले होते. त्यामुळे भाजपच्या या जादूपासून मतदारांनी सावध झाले पाहिजे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने भारतीय जनता पक्षाच्या चारसो पार या घोषणेची मस्ती उतरवली. त्यामुळे हे आता ठिकाणावर आले आहेत. परत सत्ता येत नाही, याची जाणीव झाल्याने ते घोषणांचा पाऊस पाडू लागले आहेत.

यावेळी त्यांनी महिलांना आवाहन करीत लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये पुरेशे आहेत का? असा प्रश्न केला. ते म्हणाले, पंधराशे रुपयात काहीही होत नाही. या सरकारने एव्हढी महागाई केली आहे की, महिलांना घर चालविणे कठीण झाले.

मात्र या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. आम्ही जनता आणि महिलांच्या भल्यासाठी अनेक योजना विचारपूर्वक घेऊन आलो आहोत. महिलांसाठी यापुढे बस सेवा मोफत दिली जाईल. दरमहा तीन हजार शंभर रुपये देण्यात येतील. महालक्ष्मी योजना राबविली जाईल. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न राज्यात गंभीर बनला आहे. त्यामुळे महिलांसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे उभारण्यावर आमचा भर असेल. तीन लाख रुपयांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT