Aditya Thakre & 200 years old Banyan Tree of Nashik Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

आदित्य ठाकरेंच्या धडाडीच्या निर्णयाने वाचला २०० वर्षे जुना वटवृक्ष!

सिडको उड्डानपूलामुळे हा वटवृक्ष तोडावा लागणार होता.

Sampat Devgire

नाशिक : सिडको (Nashik) उड्डानपूलामुळे संभाजी चौकातील २४० वर्षे जुने वडाचे झाड आणि पुरातन म्हसोबा महाराज मंदीर पाडण्यात येणार होते. त्याला पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांनी विरोध करीत कालपासून फेसबूक लाईव्ह केले होते. त्याची तेव्हढ्याच सजगतेने दखल घेत राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thakre) यांनी पूलाची रचना बदलण्याच्या सूचना करूत हे झाड व देवस्थान दोन्ही वाचविले.

यासंदर्भात आदित्य ठाकरे यांनी ट्वीट केले आहे. या पुलाबाबत पर्यावरणप्रेमींच्या भावना लक्षात घेतल्या. महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याशी चर्चा केली. त्यात सुमारे २०० वर्षे जुना वटवृक्ष तसेच अन्य ४५० झाडे वाचविण्यासाठी प्रयत्न करावेत. याविषयी या पूलाची रचना बदलून वटवृक्ष व देवस्थान वाचवावे अशी सूचना केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

शहरात सिडको येथे १२४ कोटी रुपये खर्चातून उड्डानपूल प्रस्तावित होते. शहरातून त्रिमूर्ती चौकाकडे जाणाऱ्या वाहतूकीसाठी ही योजना आखली होती. यासंदर्भात शिवसेनेचे महानगर अध्यक्ष, नगरसेवक सुधाकर बडगुजर आग्रही होते. या विषयावरून भाजप व शिवसेनेत राजकीय वाद सुरु होता. दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांना आव्हान देत होते. असे असताना पर्यावरणाच्या अंगाने त्याचा वेगळा विचार झाला. त्याबाबत आदित्य ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयाने शिवसेना व भाजप या दोघांच्या श्रेयवादाच्या लढाईतील हवाच निघून गेली आहे.

यासंदर्भात श्री म्हसोबा महाराज यात्रा कमेटीतर्फे पालकमंत्री छगन भजुबळ यांना निवेदन देण्यात आले होते. तसेच कालपासून काही निसर्गप्रेमींनी त्याबाबत फेसबुक लाईव्ह केले होते. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. अनेक नागरिकांनी याबाबत पुरातन मंदीर तसेच वडाच्या झाडाला वाचवावे, असे आवाहन केले होते. विविध समाज माध्यमांवर देखील त्याची चर्चा होती. त्याची दखल घेत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्या उड्डानपुलाची रचना बदलावी असे महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याशी संपर्क करून चर्चेनंतर त्यांना सुचना केला. त्यामुळे हे पुरातन झाड तसेच म्हसोबा मंदीर दोन्ही वाचणार आहे. पर्यावरण मंत्र्यांनी ज्या सजगपणे या विषयाची दखल घेत तातडीने निर्णय़ घेतला त्याचे सर्वत्र स्वागत होत आहे.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT