Gulabrao Patil
Gulabrao Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Gulabrao Patil: संवेदना अभियानातून शेतकरी विकास होईल

Sampat Devgire

जळगाव : शेतकरी आत्महत्या (Farmers suicide) थांबविण्यासाठी, त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी, त्यांना आवश्यक ती सर्व मदत करण्यासाठी जिल्ह्यात शेतकरी संवेदना अभियान (Farmers sensation movement) राबविले जात आहे. यापुढेही जिल्ह्याच्या विकासाला प्रथम प्राधान्य राहणार असल्याची ग्वाही स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी दिली. (Government will take drive to stop farmers suicide)

जिल्हाधिकारी कार्यालयात भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्त शासकीय समारंभात झेंड्यास सलामी दिल्यानंतर शुभेच्छा संदेशात मंत्री गुलाबराव पाटील बोलत होते. या वेळी आमदार सुरेश भोळे, महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया, पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, विविध विभागांचे विभागप्रमुख व इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

गेल्या दोन महिन्यांत राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार एनडीआरफच्या मदतीच्या दुप्पट रक्कम नुकसानग्रस्तांना देण्याचा आणि दोनऐवजी तीन हेक्टर मर्यादेत ही मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे ते म्हणाले.

विमानतळाचा विस्तार

विमानतळ विस्तारीकरणाची सुमारे १.५ कोटी रुपयांची योजना प्रस्तावित आहे. यामुळे बोईंग, एअरबस यासारखी विमाने जळगाव विमानतळावरून उड्डाण घेऊ शकतील, असेही मंत्री पाटील म्हणाले.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT