Rohini Khadse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Adv Rohini Khadse Politics: रोहिणी खडसे यांचा रोख कुणाकडे?, म्हणाल्या इंदिरा गांधी होणे सोपे नाही!

Adv Rohini Khadse;NCP leader Rohini Khadse got angry and asked the Prime Minister a question directly -भारत पाकिस्तान सैन्य संघर्षात सबंध देश एकसंघपणे लष्कराच्या पाठीशी असल्याचे चित्र

Sampat Devgire

Rohini Khadse News: भारत आणि पाकिस्तान यांच्यात यांच्यात काल सायंकाळी अधिकृतपणे युद्धविराम जाहीर करण्यात आला. अर्थात पाकिस्तानने हा शब्द काही तासातच मोडला. मात्र युद्ध वीरामाचे देशभरात सगळ्यांनीच स्वागत केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष ॲड रोहिणी खडसे यांनी यावर आपल्या एक्स अकाउंट वर सुचक प्रतिक्रिया टाकली आहे. त्यासाठी त्यांनी १९७१ मधील युद्धात स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या उपस्थितीत पाकिस्तान भारताला शरण आल्याचे छायाचित्र पोस्ट केले आहे. त्यांची ही पोस्ट चर्चेचा विषय आहे.

या पोस्टमध्ये ॲड रोहिणी खडसे म्हणाल्या, इंदिरा गांधी होणे सोपे नाही!. भारत- पाक युद्धविराम झाल्यानंतर त्यांनी ही पोस्ट केली आहे. त्यामुळे त्यांचा हा सूचक इशारा किंवा लक्ष्य कोण? याबाबत कयास लावले जात आहेत. अनेक नेटकऱ्यांनी दोन्ही देशांत युद्ध सुरू असताना त्याची तुलना पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या धैर्याबाबत व बांगलादेश निर्मितीविषयी चर्चा घडवून आणली होती.

ॲड. खडसे असेही म्हणतात की, खरे तर युद्ध कोणालाच नको असते. पण पाकिस्तानच्या पुरापतींना उत्तर देणे गरजेचे होते. अपेक्षा आहे की, यातून पाकिस्तानने धडा घेतला असेल. या हल्ल्यात भारतीय सैन्याने ज्याप्रमाणे परिस्थिती हाताळली, त्यासाठी त्यांना सलाम.

ॲड खडसे यांनी भारत पाक युद्धातील ज्ञात, अज्ञात सर्वच शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली, अर्पण केली आहे. युद्धात देशातील सर्व नागरिक आणि राजकीय पक्ष एक दिलाने भारतीय सैन्याच्या पाठीशी होते. निमित्ताने देशातील एक संघपणा प्रकर्षाने आपल्या शत्रूंना इशारा देणारा होता.

या युद्धामध्ये केंद्र सरकारने घेतलेल्या भूमिकेचे सर्व विरोधी पक्ष आणि नेत्यांनी स्वागत केले होते. त्यांना पाठिंबाही दिला होता. सैन्याच्या पाठीशी संबंध देश उभा असल्याचे भारतीय नागरिकांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे अॅड खडसे यांची समाज माध्यमांवरील ही पोष्ट चर्चेचा विषय आहे.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT