India Pakistan war tension : भारत-पाकिस्तान तणावात साई संस्थानचा मोठा निर्णय; शिर्डीतील सुरक्षा यंत्रणा 'हाय अलर्ट मोड'वर

Amid escalating India-Pakistan tensions Shirdi Sai Sansthan restricted the offering of flower garlands Sai temple as part of tightened security measures : भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीमुळे शिर्डीतील साई संस्थान साई मंदिराबाबत सुरक्षा यंत्रणेनं अलर्ट मोडवर तत्पर असून मोठा निर्णय घेतला आहे.
Shirdi Sai Sansthan
Shirdi Sai SansthanSarkarnama
Published on
Updated on

Sai Baba temple security : भारत-पाकिस्तान देशात युद्धस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तान त्याच्या कुरापती थांबवण्यास तयार नाही. भारताने आतापर्यंत पाकिस्तान लष्कराचे 300 ते 400 ड्रोन हल्ले किमान केले. भारताच्या तिन्ही सुरक्षा दलाकडून पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे.

भारत लवकरच मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. रात्र झाली की, पाकिस्तान ड्रोन हल्ले करतो. पवित्र सुवर्ण मंदिर असलेल्या पंजाबच्या अमृतसर शहरावर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न पाकिस्तान लष्कराने केला. यामुळे महाराष्ट्रातील सुरक्षिततेचा आढावा घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस यंत्रणेला कडक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने जागतिक किर्ती असलेले शिर्डीतील साई संस्थानने मोठा निर्णय घेतला आहे.

भारत (India)-पाकिस्तान युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिर्डीतील साई संस्थाने मोठा निर्णय घेत, उद्यापासून साई समाधी मंदिरात फुलहार आणि प्रसाद नेण्यास मनाई असणार आहे. या निर्णयाची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. मनाईचा हा आदेश पुढील आदेशापर्यंत असणार आहे.

Shirdi Sai Sansthan
Nitin Gadkari BJP : वाजपेयींची इच्छा, बाळासाहेब विखेंना सांगताच, मिळाला पूर्तीचा मार्ग; नितीन गडकरींनी मोठ्या योजनेचा किस्सा सांगितला!

जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी सुरक्षितेतच्या दृष्टीने साई संस्थानच्या सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेतला. यानंतर बैठक झाली. यात काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. शिर्डीत (Shirdi) देश-विदेशात दररोज हजारो भक्त साई समाधीच्या दर्शनासाठी येतात, फुलहार आणि प्रसाद साई समाधीवर चढवतात, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थितीच्या पार्श्वभूमीवर भाविकांना फुलहार आणि प्रसाद साई समाधी मंदिरात नेण्यास आता मनाईचा असणार आहे. तसा निर्णय पुढील आदेशापर्यंत घेण्यात आला आहे.

Shirdi Sai Sansthan
Indian Army Operations : भारतीय सैन्याचे 5 धडाकेबाज मिशन्स, ज्यांनी जगाला केलं थक्क!

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच साई संस्थानला धमकीचा मेल देखील प्राप्त झाला आहे. या अगोदर अनेकदा धमकीचे पत्र देखील साई संस्थानला मिळाले आहेत. परंतु यावेळची परिस्थिती वेगळी आहे. भारत-पाकिस्तान या दोन्ही देशातील तणावाची परिस्थिती पाहता, आणि पाकिस्तानकडून सुरू असलेल्या ड्रोन हल्ल्यामुळे साई संस्थानमधील सुरक्षा यंत्रणा 'अलर्ट मोड'वर कार्यरत ठेवण्यात आली आहे.

पवित्र सुवर्ण मंदिर असलेल्या अमृतसर शहरावर पाकिस्तानने ड्रोनचा हल्ला चढवला होता. भारतीय लष्कराने हा हल्ला निष्फळ केला. परंतु या हल्ल्यांमुळे पाकिस्तान भारतातील धार्मिक स्थळ टार्गेट करत असल्याचे निश्चित झाले. यामुळे भारतातील प्रमुख धार्मिक स्थळांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. तसेच, युद्धजन्य स्थितीमुळे धार्मिक स्थळांच्या सुरक्षितेतचा वाढ करून, त्याचा वारंवार आढावा घेतला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com