Advay Hiray & Dada Bhuse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Advay Hiray Politics: दादा भुसे जोमात, शिवसेना ठाकरे पक्ष कोमात, अद्वय हिरे आहेत तरी कुठे?

Advay Hiray; Dada Bhuse in swing, Shivsena leader Advai Hiray Not visible in Malegaon-विधानसभेची निवडणूक संपल्यानंतर शिवसेना ठाकरे पक्षाचे उपनेते अद्वय हिरे पुन्हा मतदारांना मतदरासंघात दिसलेच नाहीत.

Sampat Devgire

Advay hiray News: मालेगाव बाह्य मतदारसंघावर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची पकड दिवसेंदिवस घट्ट होत आहे. त्यांचे विरोधक जवळपास निष्क्रिय आहे. त्यामुळे मतदारसंघात विरोधी पक्ष शोधावा लागतो, अशी स्थिती आहे.

विधानसभा निवडणुकीआधी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आपले विरोधक अद्वय हिरे यांच्या मागे खटल्यांचा ससेमीरा लावला होता. त्यातून बाहेर पडण्यासाठी हिरे यांची बरीच ताकद खर्ची पडली. त्यामुळे निवडणुकीत त्यांना राजकीय आव्हानांचा सामना करावा लागला.

मालेगाव बाह्य मतदारसंघात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे पाचव्यांदा विजयी झाले आहे. सध्यामुळे सत्तेत असल्याने त्यांची गाडी सुसाट आहे. कार्यकर्ते आणि विविध मतदारांच्या नियमित संपर्कात आहे. त्या तुलनेत अपक्ष बंडूकाका बच्छाव तुलनेने कमी सक्रिय आहेत. विशेष म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उपनेते अद्वय हिरे यांचा तर थांगपत्ताही लागत नाही.

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर शिवसेना ठाकरे पक्षाचे उपनेते हिरे यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. त्यांच्यासाठी हा पराभव अनपेक्षित होता. अपक्ष आणि शिवसेना ठाकरे पक्षातून बंडखोरी केलेल्या बच्छाव यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती.

निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर अद्वय हिरे यांनी आपण आता कार्यकर्त्यांसाठी काम करणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांसाठी परिश्रम घेऊ. या निवडणुकीत पराभव झाल्याने आपल्याला फारसा फरक पडणार नाही. हा निकाल विश्वास ठेवावा असा नसून त्यात गोंधळ असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अद्वय हिरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्या भेटीसाठी दिल्लीला गेले होते. त्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर मात्र हिरे कुठेही दिसले नाहीत. दूरध्वनीवर देखील ते उपलब्ध नसतात. त्यामुळे निवडणूक निकाल लागल्यानंतर हिरे नेमके गेले तरी कुठे? असा प्रश्न मतदारांपुढे पडला आहे.

शिवसेना ठाकरे पक्षाचे मालेगाव शहर अध्यक्ष व माजी नगरसेवक राजाराम जाधव आणि जितेंद्र देवरे हे पदाधिकारी विविध उपक्रमांमध्ये सक्रिय असतात. नुकताच त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी सराव देखील आयोजित केला होता. मात्र एकंदरच सत्ताधारी आणि मंत्री दादा भुसे यांच्यासमोर आव्हान निर्माण करण्यात या कार्यकर्त्यांना मर्यादा आहे. पक्षाचे नेतेच उपलब्ध नसल्याने कार्यकर्ते देखील सैरभैर झाल्याचे चित्र आहे.

-------

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT