Gulabrao Patil : गुलाबराव पाटलांचा शिक्षकांना वाद्‌ग्रस्त सल्ला, म्हणाले, ‘आम्ही जसं पक्षाचे लोक फोडतो; तसं तुम्ही विद्यार्थी फोडा’

Jalgaon Political News : मी विनोदाने बोललो. जसं आम्ही एकमेकांचे कार्यकर्ते फोडून पक्षात घेण्याचा प्रयत्न करत असतो. तसे शिक्षकांनी करावं.
Gulabrao Patil
Gulabrao Patil Sarkarnama
Published on
Updated on

Jalgaon, 12 April : राज्यातील नेतेमंडळींमध्ये वादग्रस्त, बेताल वक्तव्ये करण्याची स्पर्धा लागली काय अशी परिस्थिती सध्या दिसून येत आहे. सकाळपासूनच कमरेखालचे वार करण्यास सुरुवात होते, ते रात्रीपर्यंत सुरूच असतात. त्यातून आपण स्वतःच आपले अवमूल्यन करून घेत आहोत, याचे भान कोणालाही राहिलेले नाही. अगदी मंत्रिपदावर बसलेल्या व्यक्तींकडून अशीच विधाने केली जात आहेत, त्यामुळे राजकारणातील नीतीमूल्यांचा ऱ्हास किती मोठ्या प्रमाणात झाला आहे, हे दिसून येते. असेच काहीसे वाद्‌ग्रस्त विधान राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

जळगाव जिल्ह्यातील एका शैक्षिणक कार्यक्रमात बोलताना पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी शिक्षकांना एक वादग्रस्त सल्ला दिला आहे. गुलाबराव पाटील यांची जीभ घसरण्याची ही काय पहिलीच वेळ नाही, यापूर्वीही त्यांनी वाद्‌ग्रस्त विधाने केली आहेत. ते म्हणाले, माझ्यासुद्धा शाळा आहेत, त्यातील एक शाळा ही पाली येथे आहे, दुसरी शाळा वडजी येथे आहे. आपल्या पंधरा दिवसांत शाळा सुरू होणार आहेत.

मागील वर्षी जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या ४३ हजार इतकी होती. त्याच्यात काय वाढ झाली आहे, असे विचारले, त्यावेळी काहीच वाढ झालेली नाही, असे सांगण्यात आले. आम्ही जसं पक्षाचे लोक फोडतो, तसं तुम्ही विद्यार्थी फोडले पाहिजेत,’ असा वाद्‌ग्रस्त सल्ला पाटील यांनी उपस्थित शिक्षकांना दिला.

Gulabrao Patil
Raju Shetti : खासदारकी गेली, निष्ठावंत सवंगड्यांनी साथ सोडली; करिष्मा संपलेल्या शेट्टींपुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बालेकिल्ला राखण्याचे चॅलेंज

दरम्यान, आपल्याकडून चुकीचे विधान गेल्याचे लक्षात येताच गुलाबराव पाटील यांनी नेहमीप्रमाणे यू टर्न घेतला आहे. मी विनोदाने बोललो. जसं आम्ही एकमेकांचे कार्यकर्ते फोडून पक्षात घेण्याचा प्रयत्न करत असतो. तसे शिक्षकांनी करावं. या बोलण्यामागे कोणताही चुकीचा भाव नव्हता. शाळेतील पटसंख्या कशी वाढेल, ते विनोदाने सांगण्याचा तो प्रयत्न होता, असे स्पष्टीकरण गुलाबराव पाटील यांनी दिले आहे.

Gulabrao Patil
Shivaji Maharaj Statue in Arabian Sea : अरबी समुद्रातील ‘छत्रपतीं’च्या स्मारकाबाबत फडणवीसांची थेट रायगडाहून अमित शाहांच्या साक्षीने मोठी घोषणा! (Video)

‘हेमा मालिनीच्या गालासारखे रस्ते’

गुलाबराव पाटील यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर टीका करतानाही अशी जीभ घसरली होती. खडसे हे मुक्ताईनगर भागातील ३० वर्षांपासून आमदार आहेत. मात्र, त्यांना आपल्या मतदारसंघातील रस्ते चांगले करता आलेले नाहीत. माझ्या धरणगाव मतदारसंघात हेमा मालिनीच्या गालासारखे सुंदर रस्ते मी केलेले आहेत, असे विधान गुलाबराव पाटील यांनी केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com