Adway Hire, Sanjay Raut & Bandukaka Bachhav Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sanjay Raut Politics: संजय राऊत यांनी मंत्री दादा भुसेंना दाखवला कात्रजचा घाट?

Advay Hiray Politics; Eknath Shinde's Shivsena is Modi and Amit Shah`s Shivsena-खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांची असल्याचे म्हटले.

Sampat Devgire

Sanjay Raut News: शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी शनिवारी मालेगाव शहराचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी विधानसभेसाठी आपले पत्ते खुले केले. त्यांच्या या डावपेचाने एकाचवेळी मंत्री दादा भुसे आणि बंडूकाका बच्छाव दोघांचीही गैरसोय झाली.

मालेगाव बाह्य मतदार संघातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार कोण? याबाबत गेले महिनाभर गोंधळाची स्थिती होती. बारा बलुतेदार संघटनेचे नेते बंडूकाका बच्छाव यांनी दोन मेळावे घेऊन आपली उमेदवारी जाहीर केली होती. शिवसेना ठाकरे पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळेल, अशी त्यांची अपेक्षा होती.

प्रत्यक्षात मात्र शनिवारी खासदार राऊत यांनी थेट मालेगाव शहर गाठले. यावेळी त्यांनी मालेगाव बाह्य मतदारसंघातील अनेक विषयांवर पूर्णविराम दिला. शिवसेना ठाकरे पक्षाकडून उपनेते अद्वय हिरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

हिरे हेच मालेगाव बाह्यचे पुढचे आमदार असतील, असे राऊत यांनी स्पष्ट केले. श्री बच्छाव यांच्याशी दिल्लीत कोणतीही चर्चा झाली नाही. शिवसेना ठाकरे पक्षाची उमेदवारी देण्याचा निर्णय मातोश्री वर होतो. दिल्लीत नाही, असा खुलासा त्यांनी केला.

खासदार संजय राऊत यांच्या या निर्णयामुळे शिवसेनेचे इच्छुक बच्छाव यांची मोठी अडचण होणार आहे. आता श्री बच्छाव यांना तिसरा उमेदवार म्हणून पाहिले जाईल. ते शिवसेनेचा आदेश पाळतात की, नवा दरवाजा ठोठावतात याची उत्सुकता आहे.

पालकमंत्री भुसे हे खासदार राऊत आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख टार्गेट आहेत., या मतदारसंघातून हिरे आणि भुसे यांच्यात गेले काही दिवस सातत्याने अत्यंत टोकाचे आरोप आणि सत्तेच्या माध्यमातून हिरे यांच्यावर झालेल्या केसेस या स्वरूपात राजकीय सुरू आहे.

शिवसेना ठाकरे पक्षाने यामध्ये हिरे यांची सातत्याने पाठराखण केली आहे. आता पालकमंत्री भुसे यांना हिरे यांचा सामना करावा लागणार आहे. त्यात त्यांच्या निकटचे सहकारी बच्छाव हे देखील त्यांच्यापासून दूर गेले आहेत.

मंत्री भुसे आणि बच्छाव यांच्यात यापूर्वीच्या निवडणुकांत एकोपा होत आला आहे. यंदा मात्र यांच्यात एकोपा होण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. त्यामुळे शिवसेना नेते खासदार राऊत मालेगावला आल्यावर त्यांनी अनेकांची राजकीय कोंडी केली आहे.

बारा बलुतेदार संघटनेचे बच्छाव यांना तर खासदार राऊत यांनी चक्क कात्रजचा घाट दाखविला आहे. अशा स्थितीत मालेगाव बाह्य मतदार संघाची आगामी निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. या स्थितीत काँग्रेस पक्षालाही या मतदारसंघावरील आपला अधिकार सोडावा लागणार आहे.

शिवसेना मुख्यमंत्री शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांना देखील आगामी निवडणुकीतील या आव्हानाची जाणीव झाली आहे. त्यामुळेच त्यांनी हिरे यांची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. आगामी निवडणुकीत मतदारसंघातील प्रश्न आणि अडचणी यापेक्षा हिरे आणि भुसे यांच्यातील व्यक्तिगत वादविवाद हाच राजकीय मुद्दा प्रचारात आघाडीचे मुद्दे असतील.

बंडूकाका बच्छाव यांनी स्वतंत्र उमेदवारी केल्यास त्याची झळ प्रामुख्याने हिरे यांच्यासह मंत्री भुसे यांनाही बसू शकते. बच्छाव हे भुसे यांचे निकटवर्तीय होते. दोघांचेही अनुयायी समान आहेत. प्रामुख्याने बच्छाव यांचा प्रभाव भुसे यांचा बालेकिल्ला असलेल्या शहरी भागात आहे. त्यामुळे आगामी निवडणूक अतिशय रंजक होईल, हे नक्की.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT