Dr. Advay hiray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Malegaon Shivsena Politics : अद्वय हिरे यांना चार दिवस पोलिस कोठडी

Adway Hire Politics, court sanction four days police custody to Adway Hiray-जिल्हा बँकेने मंजूर केलेल्या कर्जाचे पैसे परस्पर अन्य मार्गाने वळविल्याचा पोलिसांचा आरोप

Sampat Devgire

Malegaon Shivsena Politics : शिवसेनेचे उपनेते डॉ. अद्वय हिरे यांना जिल्हा बँक कर्ज प्रकरणात अटक केली होती. आज त्यांना मालेगाव जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी न्यायालयाने पोलिसांना तपासासाठी हिरे यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. (Shivsena dy. leaders Adway hire send to Police custody for four days)

जिल्हा बँकेचे माजी संचालक तसेच शिवसेनेचे (Shivsena) उपनेते डॉ. अद्वय हिरे यांना आज न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी (Police) सुनावली. आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना काल भोपाळ येथून ताब्यात घेतले. याबाबत पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) तसेच राज्य सरकारवर हिरे समर्थकांनी गंभीर आरोप केले आहेत.

आज सकाळी डॉ. हिरे यांना मालेगावच्या जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी पोलिसांच्या वतीने सरकारी वकिलांनी हिरे यांनी जिल्हा बँकेकडून रेणुकादेवी औद्योगिक सहकारी संस्थेसाठी ७.४६ कोटींचे कर्ज घेतले होते. हे कर्ज यंत्र-सामग्री खरेदीसाठी होते. मात्र, खरेदी न करता ही रक्कम परस्पर अन्य पतसंस्थेकडे वर्ग करण्यात आली. नंतर ही रक्कम अन्य मार्गाने वळविली. यामध्ये बँकेची आर्थिक फसवणूक झाली आहे. त्याच्या तपासासाठी पोलिस कोठडीची मागणी केली होती.

यासंदर्भात सरकारी वकिलांच्या मताला विरोध करीत हिरे यांचे वकील अॅड. एम. वाय काळे यांनी पोलिसांनी सादर केलेल्या आरोपांत काहीही तथ्य नसल्याचे सांगितले. यासंदर्भात अद्वय हिरे यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. हे प्रकरण आठ वर्षे जुने आहे. बँकेने याबाबत स्वतंत्र कार्यवाही केलेली असून, त्यात हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे कोठडीच्या मागणीला विरोध केला. त्यानंतर न्यायालयाने चार दिवसांची कोठडी सुनावली.

दरम्यान, आज शिवसेना उपनेते डॉ. हिरे यांना न्यायालयात हजर करणार असल्याने त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी न्यायालयाच्या प्रवेशद्वारात होती. गर्दी वाढतच असल्याने पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून मुख्य प्रवेशद्वार बंद करून तेथे मोठा बंदोबस्त ठेवला होता. हिरे यांना मागच्या दरवाजाने न्यायालयात नेण्यात आले. हिरे यांचे समर्थक न्यायालयाच्या निकालाची उत्सुकतेने वाट पाहात होते. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाबाबत पत्रकारांना माहिती देण्यास नकार दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT