BJP vs Uddhav Thackeray  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP Politics: नाशिकमध्ये मोठा राजकीय भूकंप,भाजपनं ठाकरेंचा ताकदवान नेता फोडला,मंत्री भुसेंच्या सुसाट राजकारणाला ब्रेक ?

Uddhav Thackeray Shivsena : मालेगाव बाह्य मतदारसंघावर शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांची पकड दिवसेंदिवस घट्ट होत असल्याची चर्चा असतानाच त्यांचे कट्टर विरोधक अद्वय हिरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावरच महायुतीत दाखल होत पुन्हा एकदा जोरदार कमबॅक केलं आहे.

Deepak Kulkarni

Nashik News: महाराष्ट्रात विधानसभेनंतर पुन्हा एकदा निवडणुकीची जोरदार धामधम सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांतंर्गत नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा सोमवारी (ता.17) अखेरचा दिवस होता. भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीसह सर्वच राजकीय पक्षांनी आपले महत्त्वाचे पत्ते खुले केले. आता याचदरम्यान, नाशिकच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप घडला आहे.

नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेचे उपनेते अद्वय हिरे यांनी मोठा राजकीय निर्णय घेतला आहे. हिरे यांनी अखेर शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. ते आता मंगळवारी (ता.18) भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. मुंबई येथील भाजपच्या कार्यालयात अद्वय हिरे यांचा पक्षप्रवेश पार पडणार आहे. हिरे यांच्या पक्षप्रवेशानं नाशिकच्या राजकारणात भाजपची ताकद वाढली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अद्वय हिरे (Adway Hire) हे मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. तसेच ते भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याचेही बोलले जात होते. अखेर हिरे यांनी स्थानिक निवडणुकांच्या तोंडावर उद्धव ठाकरेंची साथ सोडत अखेर भाजपची वाट धरली आहे. त्यांनीच भाजपप्रवेशाच्या चर्चांना सोशल मीडियावरुन सुरू असलेल्या चर्चांना हिरे यांच्याकडूनच अधिकृत दुजोरा मिळाला आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री दादा भुसे यांना अद्वय हिरे यांनी विधानसभा निवडणुकीत कडवी झुंज दिली होती. अद्वय हिरे यांच्यासोबतच अपूर्व हिरे, प्रसाद हिरे, तुषार शेवाळे हेही भाजप प्रवेश करणार असल्यानं ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. महाविकास आघाडीतील अनेक बड्या नेत्यांनी स्थानिकच्या तोंडावर महायुतीची वाट धरली आहे. ही गळती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. याचा सर्वात मोठा फटका शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला बसला आहे.

मालेगाव बाह्य मतदारसंघावर शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांची पकड दिवसेंदिवस घट्ट होत असल्याची चर्चा असतानाच त्यांचे कट्टर विरोधक अद्वय हिरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावरच महायुतीत दाखल होत पुन्हा एकदा जोरदार कमबॅक केलं आहे.

काही दिवसांपूर्वीच अद्वय हिरे यांनी स्थानिकच्या निवडणुकीत आपण कार्यकर्त्यांसाठी परिश्रम घेऊ. तसेच विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाने आपल्याला फारसा फरक पडणार नसल्याचंही म्हटलं होतं. तसेच हा निकाल विश्वास ठेवावा असा नसून त्यात गोंधळ असल्याचा गंभीर आरोप हिरे यांनी करत मोठी खळबळ उडवून दिली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT