Adway Hire : तुरुंगातून बाहेर येताच ठाकरे गटाच्या नेत्याने दादा भुसेंना ललकारले, 'आता फक्त मी आणि मीच, तू...'

Adway Hire dada Bhuse shivsena : माझ्यावर अधिकाऱ्यांनी मंत्र्यांच्या सांगण्यावरून गुन्हे दाखल केले. प्रत्यक्ष न्यायालयात वेगळेच सादर केले. अधिकारी राजकीय कारस्थानाचा भाग बनले, असा आरोप अद्वय हिरे यांनी केला आहे.
Adway Hire dada Bhuse
Adway Hire dada Bhusesarkarnama
Published on
Updated on

Adway Hire News : शिवसेना उपनेते डॉ अद्वय हिरे यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यामुळे ते नऊ महिन्यानंतर कारागृहातून बाहेर आले आहेत. तुरुंगातून बाहेर येताच हिरे यांनी पालकमंत्री दादा भुसे यांना खुले आव्हान दिले.

'आता फक्त मी आणि मीच, तू निघ', अशा एकेरी शब्दांत हिरे यांनी भुसे यांचा समाचार घेतला. आपल्यावरील सर्व आरोप हा सत्तेचा गैरवापर आहे. यातील एकही आरोप आणि एफआयआर कायदेशीर दृष्ट्या गुन्हा ठरत नाही, असा दावा देखील हिरे यांनी केला.

आगामी काळात दादा भुसे यांनी केलेल्या आरोपांबाबत आपण मतदारसंघातील जनतेसाठी श्वेतपत्रिका काढणार आहोत. ही श्वेतपत्रिका प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचेल. हिंमत असेल तर पालकमंत्री भुसे यांनी देखील माझ्यावर केलेल्या आरोपाची श्वेतपत्रिका काढून दाखवावी, असे खुले आव्हान हिरे यांनी भुसे यांना दिले आहे.

माझ्यावर अधिकाऱ्यांनी मंत्र्यांच्या सांगण्यावरून गुन्हे दाखल केले. प्रत्यक्ष न्यायालयात वेगळेच सादर केले. हे सर्व राजकीय कारस्थानाचा भाग बनले. त्यामुळे या अधिकाऱ्यांवर देखील मी न्यायालयात जाऊन कारवाई करणार आहे, असा इशारा हिरे यांनी दिले आहे.

Adway Hire dada Bhuse
Madhav Bhandari : सर्व्हे महत्त्वाचे नाहीत, आमचे आमदार जास्त, आम्हीच...; माधव भंडारींच्या विधानामुळे महायुतीमधील मित्रपक्षांमध्ये चलबिचल

ठाकरे, राऊतांचे आभार

मला आणि माझ्या कुटुंबाला गेले नऊ महिने खूप त्रास झाला आहे. या कालावधीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नेते खासदार संजय राऊत यांनी आमच्या पाठीशी उभे राहून दिली मदत केली. त्यामुळे मी फक्त कार्यकर्त्या नव्हे तर ठाकरे परिवाराचा एक सदस्य बनलो आहे, असे हिरे म्हणाले.

दादा भुसे यांना आव्हान

विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र मालेगाव बाह्य मतदारसंघात निवडणुकीचा प्रचार आणि वातावरण आत्ताच शिगेला पोहोचले आहे.डॉ अद्वय हिरे हे पुन्हा सक्रिया झाल्याने पालकमंत्री दादा भुसे यांना आगामी राजकीय आव्हान नक्कीच सोपे नसेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Adway Hire dada Bhuse
Praveen Korgantiwar : पूजा खेडकरला मदत करणं अधिकाऱ्याला भोवणार! प्रशासनाने नेमली चौकशी समिती

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com