Nashik Crime: 'कायद्याचा बालेकिल्ला' म्हणवणाऱ्या नाशिक पोलिसांना चपराक! शहरातील मल्टिनॅशनल कंपनीत कर्मचारी महिलांचं होतंय लैंगिक शोषण 
उत्तर महाराष्ट्र

Nashik Crime: 'कायद्याचा बालेकिल्ला' म्हणवणाऱ्या नाशिक पोलिसांना चपराक! शहरातील मल्टिनॅशनल कंपनीत कर्मचारी महिलांचं होतंय लैंगिक शोषण

Nashik Crime: नाशिक सध्या महिला लैंगिक अत्याचाराच्या घटनांमुळं सातत्यानं चर्चेत आहे. यामध्ये स्वयंघोषित ज्योतिषी आणि आध्यात्मिक गुरु अशोक खरातचं प्रकरण, एनजीओ चालक रविंद्र एरंडेकडून नोकरीच्या आमिषानं तब्बल १२१ महिलांचं लैंगिक शोषण केल्याचं प्रकरण ताज आहे.

Amit Ujagare

Nashik Crime: नाशिक सध्या महिला लैंगिक अत्याचाराच्या घटनांमुळं सातत्यानं चर्चेत आहे. यामध्ये स्वयंघोषित ज्योतिषी आणि आध्यात्मिक गुरु अशोक खरातचं प्रकरण, एनजीओ चालक रविंद्र एरंडेकडून नोकरीच्या आमिषानं तब्बल १२१ महिलांचं लैंगिक शोषण केल्याचं प्रकरण ताज आहे. त्यातच आता आता शहरात तिसरं एक नवं प्रकरण उजेडात आलं आहे. एका मल्टिनॅशनल अर्थात बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषणाचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ९ जणांवर पोलिसांत गुन्हे देखील दाखल झाले आहेत. त्यामुळं एकच खळबळ उडाली असून 'कायद्याचा बालेकिल्ला' म्हणवणाऱ्या नाशिकमध्ये पोलिसांची केवळ चमकोगिरीच सुरु आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

नेमका प्रकार काय?

नाशिकमधील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत महिलांवर विनयभंग, लैंगिक आणि मानसिक अत्याचाराची प्रकरणं उघड झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. इतकंच नव्हे तर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोपीही करण्यात आला आहे. या प्रकरणात महिला विनयभंग आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी आतापर्यंत ९ गुन्हे दाखल झाले आहेत. यांपैकी ६ आरोपींना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता त्याच्या तपासासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. सहायक पोलीस आयुक्तांच्या (गुन्हे) नेतृत्वाखाली याप्रकरणाचा तपास सुरू आहे.

दरम्यान, सर्व खाजगी संस्थांना महिलांच्या सुरक्षेबाबत कडक उपाययोजना करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. याप्रकरणात आणखी पीडित महिलांच्या तक्रारीसाठी पोलिसांकडून ९१२३२३२३११ हा हेल्पलाइन नंबर प्रसिद्ध करण्यात आला आहे. तसंच कंट्रोल रूम ११२ वर संपर्क करता येणार आहे. याप्रकरणात तक्रार दाखल करणाऱ्याची ओळख गुप्त ठेवण्यात येणार आहे. त्यामुळं कोणीही तक्रार देण्यासाठी घाबरु नये असं आवाहन नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप मिटके यांनी केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT