Ex MLA Asif Shaikh Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Asif Sheikh Politics: मालेगाव शहरातही 'व्होट चोरी'... ४२ हजार बोगस मतदार?, विधानसभा निवडणुकीत षडयंत्र?

Vote Theft in Malegaon: 42,000 Bogus Voters Found: माजी आमदार आसिफ शेख यांचा एमआयएम पक्षावर भाजपची बी टीम असल्याचा आरोप.

Sampat Devgire

Malegaon Voter Fraud: ‘इस्लाम’ पार्टीचे नेते आणि माजी आमदार आसिफ शेख यांनी निवडणूक आयोगावर गंभीर प्रश्नचिन्ह केले आहे. मालेगाव मध्य मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर बोगस मतदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यासंदर्भात आगळावेगळा कव्वाली मोर्चा काढून त्यांनी निषेध केला.

देशभरात सध्या वोट चोरी हा राजकीय मुद्दा गाजतो आहे. या संदर्भात लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. मालेगाव शहरातील माजी आमदार असिफ शेख यांनीही त्याची पुनरावृत्ती केली आहे.

मालेगाव मध्य मतदार संघात एमआयएम पक्षाचे मौलाना मुफ्ती इस्माईल हे विधानसभा निवडणुकीत अत्यल्प आघाडी घेत विजयी झाले. त्या विरोधात माजी आमदार अशिफ शेख यांनी सातत्याने आवाज उठविला आहे. या शहरात ४२ हजार ८२१ बोगस मतदार असल्याचा आरोप त्यांनी केला.

यासंदर्भात गेले सहा महिने त्यांनी मतदारयादीचा अत्यंत विभागनिहाय अभ्यास केला. यामध्ये गंभीर दोष आढळल्याचा दावा त्यांनी केला. त्याचा तपशील त्यांनी सादर केला. ६ हजार २२० मतदारांचे पत्ते नाहीत.

१३ हजार ४५६ मतदारांच्या नावापुढे फक्त क्रमांक आहे. अनेकांचे चेहरे ओळखता येत नाही. आधार कार्ड ऐवजी मतदारांचे फोटो आहेत. ११ हजार मतदारांची दोन वेळा नावे आहेत, अशी माहिती माजी आमदार शेख यांनी दिली.

माजी आमदार शेख यांच्या नेतृत्वाखाली शहरात कव्वाली मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. मालेगाव मध्य मतदार संघातील घोटाळा शोधण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त करण्यात यावी. सदोष यादी करणाऱ्या बीएलओ यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

मालेगाव मध्य मतदार संघात मतदार यादी जाणीवपूर्वक घोळ करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत ४२ हजार मतदारांची वाढ झाली.

या संदर्भात मतदानाची चोरी कशी होते याचे डिजिटल सादरीकरण त्यांनी केले. यापूर्वी देखील कोविड काळात तीस हजार मतदार वाढले होते. तयार केल्यानंतर ३६ हजार ८३८ मतदार वगळण्यात आले.

सत्ताधारी भारतीय जनता पक्ष मतदानाचे घोटाळे करतो. भाजपला एमआयएम हा पक्ष अल्पसंख्यांक बहुल मतदारसंघात घोटाळे करण्यासाठी मदत करतो. एमआयएम हा पक्ष भाजपची (BJP) बी टीम असल्याचा आरोप त्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT