Scrap Theft : सत्ताधारी पक्षाचे नेते भंगार चोर? थेट व्हिडिओ दाखवले; माजी आमदाराचा तहसील कार्यालयावर मोर्चा

Niphad Sugar Factory Anil Kadam Protest : सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी निफाड सहकारी कारखाना भाडेतत्वावर चालवण्यासाठी घेतला मात्र कारखाना बंद पाडून त्यातील भंगार त्यांनी विकल्याचा आरोप होतो आहे.
Niphad Sugar Factory Anil Kadam Protest
Niphad Sugar Factory Anil Kadam Protest sarkarnama
Published on
Updated on

Anil Kadam News : राज्यात सहकारी चळवळीत ऐतिहासिक ठसा उमटवणाऱ्या निफाड सहकारी साखर कारखान्याची वाताहत झाली आहे. भाडेतत्त्वावर कारखाना घेतलेल्या सत्ताधारी पक्षातील काही राजकीय नेत्यांनी तो सुरू करण्यासाठी कोणतीही उपाययोजना न करता, उलट मौल्यवान यंत्रसामग्री व तांबे-पितळाचे भाग चोरून विकल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार अनिल कदम यांनी मोर्चा काढला. त्यांच्या नेतृत्वाखाली शेकडो नागरिक, कामगार व सभासदांनी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढत भंगार विक्री प्रकरणी संबंधित नेत्यांवर गुन्हे दाखल करण्याची, कामगारांचे थकित देणे देण्याची आणि कारखान्याची जमीन विक्री थांबवण्याची मागणी केली.

मोर्चा दरम्यान कामगारांनी धक्कादायक माहिती उघड केली. कारखाना भाडेतत्त्वावर घेतल्यावेळी व आताच्या स्थितीचे व्हिडिओ पुरावे उपलब्ध असून मौल्यवान यंत्र, तांब्याचे सुट्टे भाग चोरून नेल्याचा व्हिडिओ उपलब्ध आहे, असे म्हटले. तसेच सत्ताधारी पक्षाचा आश्रय असल्याने पोलिसांवर दबाव असल्याचा आरोपही केला.

Niphad Sugar Factory Anil Kadam Protest
Maratha Reservation : जरांगे मुंबईला जाण्यावर ठाम अन् इकडे मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत अडचणी असल्याचा गृहविभागाचा अहवाल आला समोर

तीव्र आंदोलनााच इशारा

या आंदोलनात अनिल कदम यांच्यासह सचिन वाघ पक्षाचे तालुकाध्यक्ष खंडू बोडके पाटील, बी.जे. पाटील, प्रमोद गडाख, धोंडीराम रायते, अर्जुन बोराडे आदींनी सहभाग घेतला. "कारखाना भाडेतत्त्वावर घेऊन हजारो सभासदांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल," असा इशाराही यावेळी देण्यात आला.

सत्ताधारी आंदोलनापासून दूर

निफाड सहकारी साखर कारखाना हा निफाड तालुक्यातील प्रतिष्ठेची सहकारी संस्था होती. मात्र, राजकीय नेत्यांनी केलेला नियोजन शून्य कारभार आणि गैरव्यवहारांमुळे जिल्हा बँकेने तो ताब्यात घेतला आहे, असा आरोप करत जिल्हा बँक या कारखान्याचा लिलाव करण्याच्या प्रक्रियेवरून कारखान्याची सभासद, कर्मचारी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मैदाना उतरलेला आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार व नेते या आंदोलनापासून दूर राहिले. त्यामुळे हा प्रश्न आता पेटण्याची चिन्हे आहेत.

Niphad Sugar Factory Anil Kadam Protest
Sindhudurg News : भाजपने एकाच प्रवेशाने साधले दोन लक्ष? कुरघोडी करणाऱ्या शिवसेनेला गप्प केलं, राणेंनाही जमिनीवर आणलं...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com