Dattatray Bharne Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Farmer Loan Waiver Maharashtra : शेतकऱ्यांनो, अजून सात महिने वाट बघा; कृषिमंत्र्यांनी सांगितली कर्जमाफीची तारीख, पण दूरची!

Dattatray Bharne Announces Farmer Loan Waiver Timeline in Kopargaon Maharashtra Agriculture Minister : कोपरगाव मधील कर्मवीर शंकरराव काळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोळपेवाडी इथं आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाचा प्रारंभ कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते झाला.

Pradeep Pendhare

farmer loan waiver announcement : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी तारीख सांगितली. पण ती सात महिने दूरची असल्याने, या तारखेवर अंमलबजावणी होणार का? असा प्रश्न चर्चिला जात आहे. अहिल्यानगरच्या कोपरगाव इथं ही घोषणा केली.

"राज्यातील शेतकऱ्यांना 30 जून रोजी कर्जमाफी दिली जाईल. त्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल एप्रिल महिन्यात मिळेल. राज्यात शेतकऱ्यांच्या हिताचे सरकार आहे," असे दत्तात्रय भरणे यांनी घोषणा करताना म्हटले.

कोपरगाव (Kopargaon) कोळपेवाडी इथं कर्मवीर शंकरराव काळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाचा प्रारंभ कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते झाला. यानिमित्ताने आमदार आशुतोष काळे यांनी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. माजी आमदार अशोक काळे अध्यक्षस्थानी होते. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीण शिंदे, द्राक्षबागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक कानडे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) म्हणाले, "भाजप महायुती सरकार हे शेतकरी हिताचे सरकार आहे. शेतकऱ्यांसाठीच हे सरकार काम करत आहे. वेगवेगळ्या योजनांचा अभ्यास करून विकास निधी आणणे, हे सोपे काम नाही. उसाच्या ठिबकसाठी प्रतिटन शंभर रुपये अनुदान देऊन समितीने सरकारच्या पुढे एक पाऊल टाकले."

'मी शेतकऱ्यांच्या मुलगा असल्याने शेतकऱ्यांच्या व्यथा जाणतो. कृषियांत्रिकी योजनेद्वारे शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसह अवजारे सवलतीची दरात मिळत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील आठ लाख शेतकऱ्यांना सुरवातीला 880 कोटी रुपये आणि नंतर 626 कोटी रुपयांची पिक नुकसान भरपाई दिली. हवामानातील बदल आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. नवे तंत्रज्ञान वापरून शेती करणे गरजेचे आहे,' असे दत्तात्रय भरणे यांनी म्हटले.

कृषी विभागाचे प्रदर्शन कोपरगावात

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी, आमदार आशुतोष काळे शेतकऱ्यांना नवे तंत्रज्ञान वापरण्यास प्रोत्साहन देतात. खास यंत्रणा उभी करून मतदारसंघातील मोठा विकास निधी आणतात. दरवर्षी कृषी प्रदर्शन भरवतात. हे लक्षात घेऊन पुढील वर्षीपासून कृषी विभागाचे जिल्हा प्रदर्शन सरकारी खर्चाने कोळपेवाडी इथं भरवले जाईल, अशी घोषणा केली.

...म्हणून तीन हजार कोटीचा निधी आणले

आमदार आशुतोष काळे यांनी, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आपल्या मतदारसंघात सर्वाधिक निधी आणणारे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन मी कोपरगाव मतदारसंघाच्या विकासासाठी तीन हजार कोटी रुपयांचा निधी आणू शकलो, असा दावा केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT