Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा परभणीत 'स्फोट': सर्वांसमोर सांगितले महाविकास आघाडी सरकार पडण्याचे 'ते' मोठे कारण!

MVA collapse reason News : छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड व परभणी जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी नुकसानीची पाहणी करीत शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarama
Published on
Updated on

Parbhani News : राज्यात गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गेल्या तीन दिवसापासून मराठवाड्यातील पिकांचा पाहणी दौरा करीत आहेत. यावेळी त्यांनी छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड व परभणी जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी नुकसानीची पाहणी करीत शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी बोलताना त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडण्याचे मोठे कारणच सर्वांसमोरच सांगितले.

या भेटीवेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महायुती सरकारच्या कारभाराची वाभाडे काढताना जोरदार टीका केली आहे. ऐकवली त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडण्यामागचे षडयंत्रच सांगितले आहे. मुंबईत सगळे नियम धाब्यावर बसवून तेथील जमीन अदाणींना देण्यात आली आहे. त्यामुळे शक्तिपीठ का केलाय ? हे यातून कळेल. तिथे अदाणी यांचा सिमेंटचा प्रकल्प होत आहे. अजित पवारांच्या पोरासाठी नियम बदलले असून हे महायुती सरकार कपाळ करंटे असल्याची टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली आहे. माझे सरकार पाडण्यामागे यांचे हेच षडयंत्र होते. मी यांना त्यावेळी कुठलेही असले धंदे करुन दिले नाहीत, म्हणून त्यांनी माझे सरकार पाडले असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला.

Uddhav Thackeray
BJP Controversy: ईश्वरपूर भाजपमध्ये जुना- नवा वाद उफाळला, सम्राट महाडिकांनी मुलाखती घेताच विक्रम पाटलांनी घरीच केला 'कार्यक्रम'

परभणीतील जनता कायम आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे. त्यामुळे याठिकाणी खासदार आणि आमदार आपलाच निवडून आला आहे. असेच चित्र जर संपूर्ण राज्यात राहिले असते तर शेतकरी आत्महत्या होवू दिल्या नसत्या. भाजपमध्ये (BJP) आले की भ्रष्टाचार मुक्त होतात. शेतकरी भाजपमध्ये आले तर करणार का शेतकऱ्यांचे कर्जमाफ? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

Uddhav Thackeray
Shivsena UBT News : 'दगाबाज' सरकारला उद्धव ठाकरे जाब विचारणार! महिनाभरात दुसरा मराठवाडा दौरा करणार

राज्यातील हे महायुती सरकार दगाबाज आहे. आमची सत्ता असती तर तुमच्यावर ही वेळ येवू दिली नसती. तुमची कर्जमाफी करण्यासाठी सरकारला भाग पाडू असेही ठाकरे म्हणाले. एका शेतकऱ्याने मला सांगितले की हे सरकार रजाकारांचे आहे. त्यांच्या विरोधात कसे लढायचे हे मी मराठवाड्याला मी सांगावे. हा मराठवाडा लढावू आहे. मी बोलतोय मुख्यमंत्री का बोलत नाहीत इथे येवून असेही ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray
BJP local strategy : अमित शाहांच्या आदेशानंतर आता 'स्थानिक'साठी भाजप कुबड्या काढणार? शिंदे-अजितदादांची राजकीय कोंडी; महायुतीत 'स्वबळाचा' स्फोट होणार?

मुख्यमंत्री फडणवीस सध्या निवडणुकीमुळे बिहार गेले आहेत. मात्र, त्याठिकाणी जाऊन त्यांनी सांगायले हवे होते की मी याठिकाणी कसा शेतकऱ्यांच्या कोपराला गूळ लावून आलो आहे ते सांगायला हवे असेही त्यांनी स्पष्ट केले. तुम्ही सगळ्यांनी वोट बंदी करा. आम्हाला कर्जमुक्त करणार नाहीत तोपर्यंत महायुतीला वोट बंदी करा, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Uddhav Thackeray
Nagpur Congress : काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष विरुद्ध सुनील केदार वाद शिगेला : चिडलेल्या सपकाळांनी सगळी बैठकच अवैध ठरवली

छत्रपती संभाजीनगर येथे मोर्चा काढला त्यानंतर सरकारने पॅकेज जाहीर केले होते. आपली मागणी आहे कर्जमुक्ती आणि 50 हजार हेक्टरी मदत द्यावी, असे ठाकरे म्हणाले. जमिनी खरडून गेल्यात आता शेतकऱ्यांनी माती आणायची कुठून? असा सवाल देखील ठाकरेंनी केला. तीन वर्ष जातील शेतकऱ्यांचे आता शेती पुन्हा उभी करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत हवी आहे, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Uddhav Thackeray
BJP News : 'स्थानिक'साठी भाजप ॲक्शन मोडवर : बीडमध्ये धस-मुंडे वादावर तोडगा; लातूर, नांदेड, धाराशिवसाठीही खास रणनीती

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com