Congress news Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Congress news : काँग्रेस नवीन पदाधिकाऱ्यांच्या शोधात; थोरात अन् आहेर यांच्या दौऱ्याला कितपत यश येणार?

Balasaheb Thorat and Sharad Aher Begin Congress Organization Growth Tour in Ahilayanagar : 'मविआ'मधील काँग्रेसने राज्यात पक्षसंघटना वाढीवर भर दिला असून, अहिल्यानगरमध्ये बाळासाहेब थोरात अन् शरद आहेर दौऱ्यावर आहेत.

Pradeep Pendhare

Congress organization growth : भाजप आणि महायुतीची लाट संपू्र्ण राज्यात असताना, महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीत पुरता धुव्वा उडाला. 'मविआ'मध्ये आता काहीशी मरगळ आली. आता 'मविआ'मधील मित्र पक्ष स्वतंत्रपणे पक्ष संघटन वाढवण्यावर भर देत आहेत.

'मविआ'मधील मित्रपक्षांसमोर सत्ताधारी बलाढ्य महायुतीसमोर पक्ष संघटन कसं वाढवायचं, यावर खलबंत सुरू असतानाच, काँग्रेसने वेगळी वाट धरत कार्यवाही सुरू केली आहे. पक्ष संघटनेत मोठं बदल करत, संघटन वाढीवर भर दिला जात आहे. काँग्रेस प्रदेशने प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक नेता आणि नेमलेल्या पक्ष निरीक्षकांच्या उपस्थितीमध्ये तालुकानिहाय बैठकांचे सत्र सुरू आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात याची जबाबदारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि पक्ष प्रदेश उपाध्यक्ष तथा निरीक्षक शरद आहेर यांच्यावर सोपवली आहे.

राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्याअनुषंगानं अहिल्यानगर जिल्ह्यात काँग्रेसकडून (Congress) पक्ष संघटनेची बांधणी सुरू आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी यांना सक्रिय करण्यासाठी, चालना देण्यासाठी आणि रिक्त जागांवर पदाधिकारी नेमण्यासाठी बाळासाहेब थोरात आणि पक्ष निरीक्षक शरद आहेर, हे दोघं जिल्हा दौरा करणार असल्याची माहिती शहर जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी दिली.

शरद आहेर, हे पक्ष प्रदेश उपाध्यक्ष असून, ते पहिल्यादांच अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थित तालुकानिहाय बैठकांचे आयोजन करण्यात आलं आहे.या दौऱ्यामुळे नगर जिल्ह्यात पक्ष संघटनेला बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हा दौरा संघटन वाढीबरोबर आगामी काळात कोणत्या मुद्यांवर पक्ष वाटचाल करणार, याची माहिती देणारा देखील असणार आहे.

बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि शरद आहेर यांचा हा दौरा आजपासून सुरू झाला असून, राहुरी, पारनेर, अहिल्यानगर असा असणार आहे. अहिल्यानगर शहर व जिल्हा ब्लाॅक समिती अध्यक्ष पदासाठी मुलाखती घेऊन निवड केली जाणार आहे. तसेच शनिवारी (ता. 3) श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव-पाथर्डी, बुधवारी (ता. 7) कोपरगाव, राहाता, संगमनेर आणि अकोला, तर शुक्रवारी (ता. 9) श्रीगोंदा, कर्जत-जामखेड असा असणार आहे.

सत्ता नसल्यानं काँग्रेसला पक्ष संघटन वाढवं हे दिव्यच आहे, महायुती सत्तेत, असल्याने त्यांच्यामधील मित्रपक्षांचं संघटन अलगद वाढताना दिसतं आहे, त्यांच्यातही कुरघोड्या सुरू आहे. महायुतीमधील मित्रपक्ष, 'मविआ'मधील पक्षांतील नेत्यांना फोडत, पक्षात घेण्याची स्पर्धा दिसते आहे.

यात 'मविआ'मधील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाला गळती लागली आहे. ठाकरे शिवसेनेनं स्थानिक स्वराज्य संस्थाच्या अनुषगांने ठाकरे शिवसेनेनं मुंबईसह आजूबाजूच्या महापालिकेवर लक्ष केंद्रीत, पक्ष संघटनेवर भर दिला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते मतदारसंघातील दौऱ्यावर भर दिसताना दिसत आहेत. अशात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राज्यात पक्ष संघटन वाढीवर आक्रमक असले, तरी यात कितपत यश येईल, हा आगामी काळच सांगेल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT