Vivek Kolhe : विवेक कोल्हेंना लवकरच खुशखबर मिळणार; मुख्यमंत्र्यांचा हवाला देत चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान

Chandrashekhar Bawankule Comments on Vivek Kolhe Political Rehabilitation in Shirdi Refers to Devendra Fadnavis : भाजप प्रदेशाध्यक्ष मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विवेक कोल्हे यांच्या राजकीय पुनर्वसनावर शिर्डीत मोठं विधान केलं आहे.
Vivek Kolhe
Vivek KolheSarkarnama
Published on
Updated on

Shirdi political news : विधानसभा निवडणुकीला भाजप नेतृत्वाचा शब्द अंतिम मानत, कोल्हे परिवारानं कोपरगाव मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत माघार घेतली. तत्पूर्वी कोल्हे परिवार आणि भाजप पक्ष नेतृत्वामध्ये बैठकांचे सत्र झाले. माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि त्यांचे पुत्र विवेक कोल्हे यांना मोठा शब्द मिळाल्यानेच, त्यावेळी विधानसभा निवडणुकीत माघार घेतल्याची चर्चा होती.

आता विधानसभा निवडणूक होऊन, राज्यात महायुती सरकार स्थापन झाले आहे. सरकारचा कारभार स्थिरपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहत आहेत. विधानसभा निवडणुकीवेळी निष्ठावंतांना पक्ष नेतृत्वानं दिलेले शब्द आता पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यात विवेक कोल्हे यांचं काय? त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली.

भाजप मंत्री चंद्रशेखर बावनकुळे काल शिर्डी (Shirdi) इथं होते. साईसमाधीचं दर्शन घेतल्यानंतर, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि त्यांचे पुत्र विवेक कोल्हे यावेळी बावनकुळे यांच्याबरोबर उपस्थित होते. विवेक कोल्हे यांचे राजकीय पुनर्वसन कधी होणार, असा माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नावर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली.

Vivek Kolhe
Ram Shinde felicitation : राम शिंदेंच्या सभापतीपदाला कुणा कुणाचा होता विरोध? बावनकुळे म्हणतात, माझ्याकडे यादीच...

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, "स्नेहलता कोल्हे आणि विवेक कोल्हे हे आमच्या पक्षाचे वरिष्ठ आहेत. पक्ष त्यांना निश्चित न्याय देईल. भाजप (BJP) नियमितपणे कोल्हे परिवाराच्या मागे उभा आहे. पुढे देखील राहणार आहे. लवकरच आम्ही काहीना काही निर्णय घेऊ". मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकर यावर निर्णय घेतील, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

Vivek Kolhe
UPSC टॉपर की सुपरमॉडेल? फोटोने इंटरनेटवर घातलाय धुमाकूळ!

चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हवाला देत दिलेली प्रतिक्रियेमुळे विवेक कोल्हे यांना कोठे संधी मिळणार, याची चर्चा आता जिल्ह्यात सुरू आहे. याचबरोबर कोल्हे यांच्या राजकीय संघर्षाची देखील चर्चा होऊ लागली आहे.

लोकसभा निवडणुकीपासून विवेक कोल्हे कोणत्या ना कोणत्या राजकीय कार्यक्रमानिमित्ताने अहिल्यानगर जिल्हा पिंजून काढत आहेत. सर्वच राजकीय पक्षांमधील कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याबरोबर त्यांचे स्नेहसंबंध आहेत. गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्याबरोबर युती चर्चेत होते. लोकसभा निवडणुकीत त्यांची गनिमी काव्याची भूमिका चर्चेत होती.

शिंदेंच्या शिलेदाराला झुंजवलं

नाशिक शिक्षक मतदारसंघात त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे यांना चांगलेच राजकीय आव्हान दिलं होते. किशोर दराडे यांना सुरुवातीला सोपा वाटत असलेला विजय, शेवटच्या टप्प्यात अवघड बनला होता. किशोर दराडे यांना चांगलेच विजयासाठी झुंजावा लागलं. या निवडणुकीत नवखे विवेक कोल्हे यांनी दुसऱ्या क्रमांकाच्या पसंतीची मत घेतली. किशोर दराडेंपेक्षा विवेक कोल्हेंची सर्वाधिक चर्चा झाली.

सरकारी यंत्रणांना समोरे गेले

या निवडणुकीवेळीच त्यांच्यामागे सरकारी यंत्रणांची चौकशींचा ससेमिरा लावण्यात आला होता. त्याला देखील ते अलगद समोरे गेले. विवेक कोल्हे यांचा हा राजकीय संघर्ष भाजप पक्ष नेतृत्वाच्या नजरेतून सुटला नाही. या संघर्षशील युवा नेता पक्षातच हवा, यासाठी पक्ष नेतृत्वाकडून विशेष दखल घेण्यास सुरुवात झाली.

शरद पवार यांच्याबरोबर प्रवास

दरम्यान, विवेक कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या महासंघाच्या निमित्ताने शरद पवार यांच्या संपर्कात आले. एकाच वाहनातून प्रवास देखील चर्चेत आला. विधानसभा निवडणुकीला विवेक कोल्हे कोणत्याही परिस्थिती समोरे जाणार, असे चित्र निर्माण झाले. परंतु वेळीच हस्तक्षेप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्यात यश मिळवले. देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याबरोबर स्नेहलता कोल्हे आणि विवेक कोल्हे यांची बैठक घडवून आणली. यानंतर कोल्हे परिवारांनं विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली.

अमित शाहबरोंबर बैठक

अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मोठा शब्द मिळाल्यानेच विधानसभा निवडणुकीतून कोल्हे परिवारानं माघार घेतल्याचं स्पष्ट आहे. आता राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार मोठा मताधिक्यानं कामकाज करत आहे. यात विवेक कोल्हे यांचं राजकीय पुनर्वसन कधी होणार, यावर भाजप प्रदेशाध्यक्ष मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हवाला देत दिलेली प्रतिक्रिया आता चर्चेत आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com