Balasaheb Thorat Gujarat charge Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Balasaheb Thorat Gujarat charge : थोरातांची पराभवाच्या परतफेडीसाठी, मोदी अन् शाह यांच्या गुजरातवर 'स्वारी'; काँग्रेसचं देखील बळ मिळणार

Balasaheb Thorat Assigned Organizational Responsibility for Congress in Gujarat : गुजरातमध्ये काँग्रेस संघटन बांधणीची जबाबदारी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपवली आहे.

Pradeep Pendhare

Maharashtra Congress leader : संगमनेरमध्ये गेल्या चार दशकांपासून एकहात्ती सत्ता चालवणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पाडाव झाला. थोरातांचे राजकीय संस्थान खालसा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी गुजरातमधील फौज संगमनेरच्या मैदानात उतरवली होती. यातच भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे पुत्र सुजय विखे यांनी देखील मोठी ताकद उभी केली होती. यात जो निकाल यायचा तो आला अन् बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला.

आता थोरातांना या पराभवाचा वचपा घेण्याची संधी काँग्रेसने मिळाली आहे. आगामी काळात गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. इथं काँग्रेसला संघटन बांधणीची जबाबदारी बाळासाहेब थोरातांवर दिली आहे. ही राजकीय संधी बाळासाहेब थोरात कशी यशस्वी करतात, पराभवाची फेड गुजरातमध्ये करून काँग्रेस यश देतात का? याकडे आता लक्ष लागलं आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे पक्षाने गुजरातची जबाबदारी सोपवली आहे. पक्षाच्या अत्यंत कठीण आणि पडत्या काळातही थोरात यांच्यावर काँग्रेसने पुन्हा विश्वास दाखवला असल्याचे पहावयास मिळत आहे. माजी मंत्री थोरात काँग्रेस पक्षातील अत्यंत ज्येष्ठ, एकनिष्ठ आणि विश्वासू नेते मानले जातात. गांधी घराण्याचे विशेषतः सोनिया गांधी आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे.

सध्या ते काँग्रेसच्या (Congress) राष्ट्रीय कार्यकारी समितीचे सदस्य आहेत. याआधीही पक्षाने थोरात यांच्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. 2018 मध्ये गुजरातमध्ये काँग्रेसच्या निवडणूक समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना पक्ष निरीक्षक म्हणून नेमण्यात आले होते. या सर्व जबाबदाऱ्या थोरात यांनी यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. विशेष बाब म्हणजे काँग्रेस पक्ष संकटात असताना अनेक नेते पक्ष सोडून गेले.

मात्र, थोरात पक्षाशी अखंडपणे निष्ठावान राहिले आहेत. त्यांनी पक्षाच्या चढ-उताराच्या काळातही काँग्रेसशी एकनिष्ठ राहून कार्य केले आहे. त्यामुळे पक्षातील विश्वासार्ह आणि संयमी नेतृत्व म्हणून त्यांची प्रतिमा अधिक ठसठशीत झाली आहे. गुजरातसारख्या महत्त्वाच्या आणि सध्या आव्हानात्मक स्थितीत असलेल्या राज्यात काँग्रेसचा आधारभूत संघ बांधणी करणे, पक्ष कार्यकत्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणे आणि संघटनेला बळकट करणे, अशी मोठी जबाबदारी थोरात यांच्या खांद्यावर आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि कुशल नेतृत्वाचा काँग्रेसला निश्चितच फायदा होणार आहे.

बाळासाहेब थोरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असेल, तरी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. भाजपच्या रणनीतीसमोर त्यांचे चार दशकातील राजकीय संस्थानचा पाडाव झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी यासाठी गुजरातमधील फौज संगमनेरमध्ये घुसवली होती. गुजरात भाजपचे दोन ट्रबल शूटर आमदार संगमनेरमध्ये त्या काळात तळ ठोकून होते. आमदार जगदीश मकवाना आणि किशोरीलाल बेनीवाल, अशी त्यांची नावे होती. या आमदारांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता. मोदी अन् शाह यांच्या सैन्याला विखे पिता-पुत्राकडून बळ मिळाली. परिणामी संगमनेरमध्ये थोरातांचा पराभव झाला.

थोरातांना काँग्रेसने गुजरातच्या पक्ष संघटनेची जबाबदारी दिली आहे. काँग्रेसने थोरातांना ही जाणिवपूर्वक संधी देत, पराभवाचा वचपा घेण्याची संधी दिली आहे. थोरात काँग्रेसच्या राष्ट्रीय समितीमधील सदस्य आहेत. त्यामुळे गुजरातमध्ये पक्ष संघटनेसाठी ते कोणती रणनीती अवलंबतात, त्याला काँग्रेसचं किती बळ मिळतं, याकडे आता लक्ष असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT