Eknath Shinde Sena Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

ShivsenaUBT leaders join Eknath Shinde Sena : चार दशकांपासून सोबत असणाऱ्यांचा ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'; नेमकं काय घडलं?

Shivsena UBT Leaders from Ahilyanagar–Kopargaon Join Eknath Shinde Shivsena and BJP : अहिल्यानगरच्या कोपरगावमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षातील पदाधिकाऱ्यांनी नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे.

Pradeep Pendhare

Kopargaon political updates : उद्धव ठाकरे यांना चार दशकांपासून साथ देणाऱ्या कोपरगावमधील पदाधिकाऱ्यांनी जय महाराष्ट्र केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर होत असलेल्या वेगवान हालचालींमुळे अहिल्यानगरमधील राजकारण ढवळून निघू लागलं आहे.

या निवडणुकीच्या निमित्ताने अनेकांनी पक्ष निष्ठा बाजूला सारल्या आहेत. यात कोपरगावमधील उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ असलेल्या पदाधिकाऱ्यांचा देखील नंबर लागला आहे. उद्धव ठाकरेंची साथ सोडणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे शिवसेना आणि भाजपचा रस्ता पकडला आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोपरगावमधील (Kopargaon) सेनेचे सहसंपर्कप्रमुख माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, उत्तर नगर जिल्हाप्रमुख कैलास जाधव, माजी शहरप्रमुख कलविंदर डडियाल यांनी पद आणि पक्षाचा राजीनामा दिला आहे. राजेंद्र झावरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करून सर्वांना धक्का दिला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीमध्ये लवकरच ते शिवसेनेत प्रवेश करतील, असे जिल्हाध्यक्ष नितीन औताडे यांनी जाहीर केल. कलविंदर डडियाल यांनी भाजपचे युवानेते विवेक कोल्हे यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाला साथ देण्याचे ठरवत आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. या राजीनामा सत्राने शिवसेना ठाकरे पक्षातील अंतर्गत दुफळी समोर आलीच, पण पक्षाला खिंडार देखील पडले.

शिवसेनेचा दबदबा

राजेंद्र झावरे हे चार दशकांपासून शिवसेनेशी एकनिष्ठ होते. तालुक्यातील प्रस्थापित नेत्याविरुद्ध त्यांनी कोपरगावात शिवसेना वाढवली. नगर शहराव्यतिरिक्त जिल्ह्यात कोठे शिवसेनेचा दबदबा होता, तर तो कोपरगाव इथं होता. शिवसेना तळागाळापर्यंत वाढवण्याचे काम राजेंद्र झावरे यांनी केले.

बंडानंतरही एकसंघ

शिवसेनेतील बंड झाल्यानंतर दोन गटांत विभागली गेली. तेव्हा झावरे यांना अनेक ऑफर असताना देखील त्यांनी त्या नाकारत स्थानिक पातळीवर शिवसेनेत बंड होऊ दिले नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निष्ठा कायम ठेवत पक्षाचे काम करत राहिलेले. पण, झावरे यांनी अचानक दिलेला राजीनामा अन् एकनाथ शिंदे शिवसेनेत जाण्याचा घेतलेल्या निर्णयाने राजकारणातील बदलत्या रंगांची चर्चा होऊ लागली आहे.

नाट्यमय घडामोडी

माजी शहरप्रमुख कलविंदर डडियाल यांनी समर्थकांसह माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षात दुभंगताना, वेगवेगळ्या दिशेने पदाधिकाऱ्यांनी राजकीय वाटचाली सुरू केली. या नाट्यमय घडामोडीमुळे कोपरगाव शिवसेना चर्चेत आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT