

Indurikar Maharaj news : इंदुरीकर महाराज यांच्या लेकीचा साखरपुडा शानदार झाला. पण, तो चर्चेचा विषय बनला. त्यावरून इंदुरीकर महाराज यांना आजही टिकेला समोरं जावं लागत आहे. साखरपुड्याच्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिथंही इंदुरीकर महाराज चांगलेच ट्रोल झाले.
यावरून इंदुरीकर महाराज यांनी संताप व्यक्त करताना, कीर्तनसेवेतून थांबतो, असे म्हटले होते. पण आता इंदुरीकर महाराज यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आला असून, त्यात त्यांनी मुलीचं लग्न आणखी टोलेजंग करणार असल्याचं चॅलेंज दिलं आहे.
इंदुरीकर महाराजांचा (Indurikar Maharaj) समोर आलेल्या व्हिडिओमध्ये म्हणतात की, "मला माहिती होत की, या औलादी माझ्या मुळावर उठणार आहेत. पण मी यांना चॅलेंज देऊन सांगणार आहे की, यापेक्षाही लग्न टोलेजंग करणार आहे. होऊ द्या काय व्हायचं ते! इकडं दुनिया खाल्ली लोकांनी, यांची काय टाप आहे."
राजकीय सभांवर भाष्य करताना इंदुरीकर यांनी, 'तीस मिनिटांच्या सभेसाठी तीन कोटी खर्च करतात, तिथं कोणत्याही चॅनलवाल्यांनी बोलून दाखवावं. इथं देखील चॅनलवाला आहे. त्याला विचार. पण तो थांबणार नाही. पुढील महिन्यात गावागावात तमाशा सुरू होतील. विचारणार का, ही विकली गेलेली लोकं आहेत' अशी टोलेबाजी केली.
'मी आठ दिवस बोललोच नाही, किती दुसऱ्याला त्रास द्यावा, याला देखील मर्यादा आहेत. 31 वर्षे झालं, त्रासच त्रास सुरू आहे. पण मी बोललो ते खरं होतं, हाच माझ्याबाबत घोटाळा आहे. मग अजून तमाशा होतो,' असेही इंदुरीकर यांनी म्हटलं. इंदुरीकर महाराज यांनी केलेलं हे विधान एका कीर्तनातील आहे. त्यांचं हे कीकर्तन 10 नोव्हेंबर 2025 मधील असल्याचं सांगितलं जात आहे.
इंदुरीकर महाराजांची मुलगी ज्ञानेश्वरी हिचा साखरपुडा संगमनेरमध्ये (Sangamner) मोठ्या थाटात झाला. साखरपुडा अत्यंत शाही पद्धतीने झाला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. सोहळ्यात गाड्यांचा मोठा ताफा आणि फुलांनी सजवलेली गाडी, मुलीच्या एन्ट्रीसाठी होती. साखरपुडा अत्यंत शाहीपद्धतीने साजरा झाला असून, कार्यक्रमात मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.
इंदुरीकर महाराज यांच्या मुलीच्या साखरपुड्यात, आधुनिक ट्रेंडनुसार सर्व काही होते. यावरून सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंग सुरू झालं. इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनातीलच दाखले देत ट्रोलरांनी सुनावलं. यावरून इंदुरीकर महाराज यांचे अस्वस्थ झाले आहेत आणि आता चॅलेंज देत मुलीचं लग्न आणखी टोलेजंग करणार असल्याचे म्हटल्यानं, समाज माध्यमांवर पुन्हा ट्रोलिंग होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.