Sujay Vikhe on Balasaheb Thorat Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sujay Vikhe On Balasaheb Thorat : 'पळाला, काट्यात लपला, काटे काढत बसला असेल, पण याच पोरा-बाळांनी पाडलं'; विखे पाटलांनी हिशोब काढला!

Ahilyanagar BJP Ex-MP Sujay Vikhe Slams Congress Leader Balasaheb Thorat in Rahata : संगमनेरमधील काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्यावर भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी जोरदार टीका केली.

Pradeep Pendhare

BJP vs Congress Maharashtra : विखे पाटील-थोरात यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा उफाळला आहे. भोजापूर पाण्यावरून हा राजकीय संघर्ष पेटला आहे. यात थोरात-विखे पाटील पिता-पुत्र यांच्यातील राजकीय संघर्षामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.

दोन्ही बाजूनं एकमेकांना जोरदार उत्तरं दिली जात आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांनी पोरं-बाळ, अशा केलेल्या टीकेवर भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटलांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) म्हणाले, "ते मोठे नेते आहेत, ते सल्ला देण्यासाठीच आहे. जी भूमिका ते आज घेतायत तीच भूमिका विधानसभा निवडणुकी वेळी घेतली पाहिजे होती. पोरं-बाळांवर बोलायचं नव्हतं, तर विधानसभा निवडणुकीत प्रत्येक भाषणात माझ्यावर का बोलले? अमोल खताळ यांना खबरी का म्हटलं? सुजय विखे यांना पळून लावलं, काट्यात लपला होता, काटे काढत असेल, त्यावेळेस आम्ही पोरं-बाळ नव्हतो, आज तुमचा पराभव झाला, तर आम्ही 'पोरं-बाळ' झालो". 

'बाळासाहेब यांचा आम्ही सन्मान करतो, पोरं-बाळ म्हणण्याची त्यांनी चूक केली, याच पोरा-बाळांनी त्यांचा पराभव केला. युवाशक्ती प्रचंड आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली देशात कुणाचीही दंडेलशाही चालत नाही. सर्वसामान्य माणूस आमदार होऊ शकतो, हे त्यांना कदाचित आजही पचत नाही', असा टोला विखे पाटलांनी थोरातांना लगावला.

'गेली 40 वर्ष आमची संघर्ष गेला, पुढचे ही चाळीस वर्षे आम्ही संघर्ष करायला तयार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुकीला संगमनेरमध्ये वेगळ्या पद्धतीने सामोरे जाणार आहोत. ही रणनीती आम्ही जाहीर करू शकत नाही. परंतु गेल्या 40 वर्षांमध्ये संगमनेर शहरांमध्ये राहिलेली विकास काम आम्ही पूर्ण करत आहोत. भोजापुर चारीचे पाणी प्रश्न मार्गी लावला आहे', याची आठवण विखे पाटलांनी करून दिली.

'जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिकेमध्ये महायुतीला अभूतपूर्व, असे यश मिळेल. जे लोक त्यांच्या मिटींगला जात असतील, त्यांचे आम्हाला निरोप देखील आहे. आम्हाला जावं लागतं, हीच परिस्थिती विधानसभा निवडणुकीला होती. आताही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला, अशीच परिस्थिती त्यांच्याबरोबर आहे. लोक आमच्याबरोबर आहेत', असा विश्वास विखे पाटलांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT