Manoj Jarange On BJP Fadnavis : राणे, पवार, विखे अन् चव्हाणांसह मराठा नेत्यांना फडणवीसांचा संपवण्याचा डाव; 30 ते 32 आमदार-खासदारांचे फोन केल्याचा जरांगे पाटलांचा दावा

Manoj Jarange Accuses CM Devendra Fadnavis of Ending Maratha Leaders Political Existence in Ahilyanagar : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी अहिल्यानगर इथं पत्रकार परिषद घेत, भाजप CM देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
Manoj Jarange On BJP Fadnavis
Manoj Jarange On BJP FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Manoj Jarange press conference : मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांनी अहिल्यानगर इथं पत्रकार परिषद घेत भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

जरांगे पाटलांनी यावेळी भाजपमधील मराठा नेत्यांची अस्वस्थता सांगत खळबळ उडवून दिली. जरांगे पाटलांच्या या धक्कादायक दाव्यावर भाजपकडून काय रिअ‍ॅक्शन येते, याकडे आता लक्ष लागलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी, “भाजपमधील (BJP) अनेक मराठा नेते मला फोन करून सांगतात की त्यांना त्रास दिला जात आहे. आतापर्यंत मला 30-32 आमदार-खासदारांचे फोन आले आहेत", असा दावा केला आहे. देवेंद्र फडणवीस मराठ्यांचे नेते आणि अधिकारी संपवण्याच्या कामाला लागले आहेत, असा खळबळजनक दावा जरांगे पाटील यांनी केला आहे.

'प्रत्येक मंत्र्यांना फडणवीस यांनी स्वतःचे OSD दिले आहेत. भाजप वेगळा होता. पण फडणवीस यांनी पक्षाची दिशा बदलली आहे. सत्तेसाठी त्यांनी नारायण राणे, अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhepatil), अशोक चव्हाण यांसारख्या अनेक नेत्यांना पक्षात घेतले. एवढेच नव्हे तर भाजपमधीलच अनेक नेते संपवण्याचे कामही सुरू आहे', असा दावा देखील जरांगे पाटील यांनी केला.

Manoj Jarange On BJP Fadnavis
Top 10 News : जगदीप धनखड गायब, शरद पवार अन् जरांगेंचं 'प्लॅनिंग' अन् महाराष्ट्र, बिहाराच्या मतदारयाद्याच गायब? वाचा Top-Ten राजकीय घडामोडी...

'सत्तेसाठी आपल्या लोकांना लाथा मारण्याचं काम सुरू आहे, आणि माझ्याकडे त्याची यादीही आहे. जालना, सोलापूर आणि नांदेड इथंही अनेक मराठा नेत्यांना त्रास दिला जात आहे', असेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. '“आमची परिस्थिती बिकट आहे” असे सांगणारे नेते दररोज संपर्क साधत आहेत', असा दावा जरांगे पाटील यांनी केला आहे.

Manoj Jarange On BJP Fadnavis
Jagdeep Dhankhar missing : जगदीप धनखड राजीनामा दिल्यापासून गायब; 'हेबियस कॉर्पस' दाखल करण्याचे संकेत

आंदोलनावर ठाम

मराठा आरक्षणासाठी लढा तीव्र करणार असल्याची भुमिका मनोज जरांगे पाटलांनी मांडली. मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे, त्याच्याशिवाय दुसरा आरक्षण आम्ही घेणार नाही. 29 ऑगस्टला चलो मुंबईच्या निर्णयावर आम्ही ठाम असल्याचेही जरांगे पाटील यांनी म्हटले.

समाजाची भूमिका महत्त्वाची

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये समाज निर्णय घेईल. मी, याबाबत भूमिका घेण्याचा अक्रस्ताळेपणा करणार नाही. समाजाला जो निर्णय वाटेल तो समाज घेईल फक्त आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही ठाम आहोत, अशीही भूमिका जरांगे पाटील यांनी मांडली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com