Ahilyanagar politics : राज्यात महापालिका निवडणुकांचा धुरळा सुरू आहे. क्षणाक्षणाला राजकीय चित्र बदल आहेत. सत्ताधारी अन् विरोधक यावरून एकमेकांवर निशाणा साधत आहे. राज्यात ठाकरे बंधूंची युती, दोन्ही पवारांचं एकत्र येणे, ही वेगळ्या राजकारणाची नांदी ठरत आहेत.
यातच संगमनेर नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचं चिन्ह बाजूला ठेवत, बाळासाहेब थोरातांनी मिळवलेला विजय, याची देखील चर्चा आहे. या सर्व राजकीय घडामोडींवर भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एकाचवेळी हल्ला चढवला.
राज्यात ठाकरे बंधू एकत्र आले आहेत, त्याचा किती परिणाम महापालिकांच्या निवडणुकांवर (Municipal Elections) आणि आगामी महाराष्ट्राच्या राजकारणावर होईल. यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, "ही युती त्यांच्या गरजेसाठी होत आहे. महाराष्ट्राच्या किंवा मुंबईच्या भल्यासाठी होत नाही. शिवसेनेच्या काळामध्ये मराठी माणूस उद्ध्वस्त झाला. फक्त मराठी माणसाचा राजकारण करण्यात आलं. आज तोच मराठी माणूस आमच्या मुंबईतला, यांच्या अभद्र युतीला, यांना या निवडणुकीत हद्दपार करेल." हे काही जनतेला आधार द्यायला निघालेले नाहीत. हे दोघे बंधू एकमेकांना आधार देण्यासाठी एकत्र आलेले आहेत, असा देखील घणाघात मंत्री विखे पाटलांनी केला.
'मुंबई (Mumbai) बदलत आहे. विकास दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली, महायुती सरकारच्या नेतृत्वाखाली मुंबईत वेगाने बदलत होत आहे. मुंबईचा विकास होतोय, लोकांमध्ये महायुती सरकारविषयी विश्वास निर्माण होतोय. कोणी एकत्र येतोय, याचा फरक पडत नाही. लोकांचा कामांवर विश्वास आहे. मुंबई फरक पडणार नाही, महाराष्ट्रात युती दिसणार नाही,' असेही मंत्री विखे पाटील यांनी म्हटले.
राज्यात महायुती असताना अजित पवार हे शरद पवार यांच्याबरोबर युती करताना दिसत आहे. याचा फटका महायुतीला बसेल का? यावर मंत्री विखे पाटील म्हणाले, "महायुतीत ही मंडळी काम करत असताना, महाविकास आघाडी बरोबर जात असतील, तर ते तत्त्वाशी विसंगत आहे. चुकीचं आहे. अशी भूमिका कोणी घेऊ नये, म्हणजे त्यांना माझी विनंती आहे."
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची पक्षाकडून स्टार प्रचार म्हणून झालेल्या नियुक्तीवर, मंत्री विखे पाटील यांनी चिमटा काढला. "स्टार प्रचारक म्हणून, तिथं नेमलेले आहे. त्यांनी इकडं काँग्रेसला तिलांजलि दिली आणि तिकडं काँग्रेसचे स्टार प्रचारक म्हणून काम करत आहेत. आज किती मोठा हा विरोधाभास आहे. याचा लोकांसमोर खुलासा झाला पाहिजे," असे मंत्री विखे पाटील यांनी म्हटले.
'महापालिकेतील महायुतीची तयारी 70 ते 80 टक्के झाली आहे. जागा वाटपाचा देखील आज सायंकाळपर्यंत निश्चित होऊन जाईल. काही जागांबाबत मागणी आहे, ते देखील आज सायंकाळपर्यंत पूर्ण होईल. विरोधकांकडे दुर्दैवाने उमेदवारच नाही. सगळे जण आमच्याकडे, महायुतीकडे उमेदवारी मागत आहेत. आमच्याकडे जे उमेदवार होणार नाही, तेच त्यांचे उमेदवार होणार आहेत,' असे म्हणत मंत्री विखे पाटलांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.
महायुतीच्या काही उमेदवारांकडून निवडणुकीच्या प्रचारासाठी रंगीत यादी व्हायरल होत आहे. यावर बोलताना मंत्री विखे पाटील यांनी, निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार रंगीत यादी व्हायरल व्हायला नको. निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे तंतोतंत पालन झाले पाहिजे. असं कुठे होत असेल, तर ते निश्चितपणे थांबवलं गेलं पाहिजे. तशा आपण सूचना देखील देऊ. परंतु निवडणूक आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन, कुठेही होणार नाही. याची खबरदारी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी घेतलं पाहिजे, असे सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.