ShivSenaUBT internal dispute : खासदार देशमुखांसाठी सत्काराचा स्टेज; शिवसैनिकांची दांडके, भगवे झेंडे घेत एन्ट्री अन् पुढं तुफान..! (Video)

Yavatmal ShivSenaUBT Row Over Satirical Felicitation of MP Sanjay Deshmukh : यवतमाळ नगरपालिकेत मिळालेल्या अपयशावर शिवसेनायुबीटीचे खासदार संजय देशमुखांचा उपरोधात्मक सत्कारावरून राजकीय राडा झाला.
Yavatmal ShivSenaUBT
Yavatmal ShivSenaUBTSarkarnama
Published on
Updated on

Yavatmal ShivSenaUBT : यवतमाळ नगरपालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाने मोठं अपयश आलं. नगरपालिकेतील 58 जागांपैकी एकाही जागावर यश मिळालं नाही. यावरून शिवसेना ठाकरे सेना पक्षामध्ये दुफळी निर्माण झाली.

एका गटाने थेट खासदार संजय देशमुख यांच्यावर या अपयशाचे खापर फोडत उपरोधात्मक सत्काराचा करणार असल्याचं पत्रकार परिषदेत जाहीर केलं. यावरून आज यवतमाळमधील शिवसेना ठाकरे सेना पक्षातील पदाधिकाऱ्यांना तुफान राडा झाला.

या अपयशानिमित्ताने खासदार संतोष देशमुख यांच्या सत्कारासाठी आज उपरोधात्मक स्टेज उभारण्यात आला होता. बॅनर लावण्यात आले होते. सोफा, खुर्च्या लावल्या होत्या. हार-तुरे आणण्यात आले होते. याची माहिती यवतमाळमधील (Yavatmal) शिवसेना ठाकरे सेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मिळताच, कार्यक्रमस्थळी धाव घेतली.

शिवसेना (Shivsena) ठाकरे सेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमस्थळी हातात दांडगे, हातात भगवे झेंडे घेत एन्ट्री घेतली. स्टेजमागील बॅनर उतरवला, स्टेजच्या मागे कटाऊट तोडला, एक काचेच्या टेबल उचलून फेकला, खुर्च्या पांगून दिल्या. कार्यक्रमस्थळी दुसरा कोणताच गट नव्हता, त्यामुळे पदाधिकाऱ्यांमधील संघर्ष टळला. खासदार देशमुखांचा उपरोधात्मक सत्काराचा कार्यक्रम एकप्रकारे उधळून लावला.

Yavatmal ShivSenaUBT
Bhaskar Jadhav role controversy : शिवसेना फुटीवेळी आम्ही ठाकरेंबरोबर, भास्कर जाधवांचा बैठकीत आरडाओरडा अन्..; जयस्वालांनी शपथ घेऊन सांगितला प्रसंग!

शिवसेना ठाकरे सेना पक्षाचे स्थानिक नेते राजेंद्र गायकवाड, जिल्हाप्रमुख किशोर इंगळे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी हा उपरोधात्मक कार्यक्रम उधळून लावला. यानंतर दोन्ही गट आमने-सामने आले. गायकवाड अन् इंगळे यांनी पक्षातून निलंबित करण्यात आलेला संतोष ढवळे याला या प्रकाराचा जाब विचारताना, ही नाटकबाजी कशासाठी? असा प्रश्न केला. यावेळी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. संतोष ढवळे यांनी यावर मी शिवसेनेतच राहणार असल्याचं ठासून सांगितलं.

Yavatmal ShivSenaUBT
Kagda Chandya Padvi : 'RSS'ने रणनीती आखाव्यात, भाजपने पैसा फेकावा, आयोगानं..; काँग्रेसच्या पाडवींकडून परिवर्तनाचा शंखनाद!

शिवसेनेचे ठाकरे सेना पक्षाचे राजेंद्र गायकवाड म्हणाले, "संतोष ढवळे यांची पक्षातून हकालपट्टी झाली आहे. यानंतर पक्षाची बदनामी करत निवडणूक काळात फिरत राहिला. खासदार देशमुखांचा अपमान करण्यासाठी हा उपरोधात्मक सत्काराचा कार्यक्रम ठेवला. हरामखोरपणा करणाऱ्यांना शिवसेना काय आहे, हे दाखवण्यासाठी कार्यक्रमस्थळी शिवसैनिक जमा झाले होते. शिवसेनेला आव्हान देणाऱ्याला आम्ही त्याची जागा दाखवून दिली. हे गद्दार आहेत. नगरपालिकेत पंजाचं काम केलं."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com