Radhakrishna Vikhe Patil 1 Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe Patil : 'उलट आमचे अनेकांना दणके बसलेत'; '420'च्या दाखल गुन्ह्यावरून टीकेची झोड उठवणाऱ्यांवर मंत्री विखे संतापले

Radhakrishna Vikhe Patil Strong Reply to Opposition in Fraud Case Ahilyanagar BJP News : शेतकऱ्यांसाठी काढलेल्या कर्जात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर चहूबाजूने टीका झाल्यानंतर भाजप मंत्री राधाकृष्ण विखे विरोधकांवर संतापले.

Pradeep Pendhare

Ahilyanagar BJP news : भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यावर, त्यांनी माध्यमांसमोर येत टीकाकारांवर तोफ डागली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत, उपनेत्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांच्यासह विरोधकांना चांगलेच सुनावलं.

आमच्या अडचणी वाढत नाहीत आणि आम्हाला दणकाही बसत नाही. त्यांनी त्यांच्या पत्रा चाळीची काळजी घ्यावी. काहींना माझं नाव घेतल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही, असा टोला लगावला.

भाजप (BJP) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात थेट गुन्हा दाखल झाल्याने विरोधकांना टीका करण्याचे आयतं हत्यार मिळालं. चहूबाजूने टीका झाली. यावर आता मंत्री विखे पाटलांनी मौन सोडत, टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आमच्या अडचणी वाढत नाहीत आणि आम्हाला दणकाही बसत नाही, उलट आमचे अनेक लोकांना दणके बसलेले आहेत, असं म्हणत विरोधकांना सुनावलं आहे.

मंत्री विखे पाटील म्हणाले, "खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) पत्रा चाळीची काळजी घ्यावी. सुषमा अंधारेंसारख्या काही लोकांना माझं नाव घेतल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही. आम्ही आरोपांची चिंता करत नाही. आमचा कारभार स्वच्छ आहे, जे केलं ते जनतेसमोर आहे". अपहाराचे आरोप फेटाळत, कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत, असे मंत्री विखे पाटील यांनी म्हटले.

'आरोप करणाऱ्यांना जनतेचा विश्वास का संपादन करता आला नाही? राजकारणासाठी आरोप सुरू आहेत. आरोप करणाऱ्यांचे बोलवते धनी वेगळे आहेत. प्रत्येकाला आरोप करण्याचा अधिकार असला, तरी या प्रकरणातील वस्तुस्थिती वेगळी असून, ती समजून घेतली पाहिजे. रक्कम कारखान्याकडे कधी आलीच नाही. 2019च्या रिपोर्टमध्ये या गोष्टी आलेल्या आहेत. माध्यमांनी सुप्रीम कोर्टाची ऑर्डर नीट वाचावी', असे अपहाराच्या आरोपावर मंत्री विखे पाटलांनी स्पष्टीकरण दिलं.

काय आहे नेमकं प्रकरण

भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अधिपत्याखाली असलेल्या डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने 2004 ते 2010 या कार्यकाळामध्ये बनावट कागदपत्रे करून बेसल डोस कर्ज काढल्याचा आरोप आहे. तब्बल 8 कोटी 86 लाख रुपयांचे काढलेले कर्ज शेतकऱ्यांना न देता, त्याचा गैरवापर केला आणि कर्जमाफीत हे कर्ज माफ करून घेत, फसवणूक केल्याचा ठपका आहे. याप्रकरणी भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह कारखान्याचे तत्कालीन संचालक, साखर आयुक्त, बँकांचे अधिकारी अशा 54 जणांविरुद्ध लोणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बाळासाहेब केरुनाथ विखे (वय 55, रा. लोणी बुद्रुक, ता. राहाता) यांनी फिर्याद दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT